साधुग्रामच्या जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:25 AM2018-06-29T01:25:30+5:302018-06-29T01:26:04+5:30
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडा लोटत नाही तोच पुन्हा याच झोपडपट्टीधारकांनी पुन्हा त्याच जागेवर अनधिकृत झोपड्या, पाल उभारून मनपा प्रशासनाला आव्हान दिले आहे.

गेल्या आठवड्यात मनपा अतिक्रमण विभागाने साधुग्रामच्या जागेवरील शंभरहून अधिक अनधिकृत झोपड्या हटविण्याचे काम केले होते तर झोपड्या हटविताना काही महिलांनी मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक करून दहशत निर्माण केली होती.
या प्रकारानंतर मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली खरी; परंतु काहींनी ऐनवेळी नमते घेतल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नव्हता.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष
शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्रामसाठी जागा आरक्षित केली असून, झोपडपट्टीधारक याठिकाणी वारंवार अनधिकृत झोपड्या थाटून मनपासमोर आव्हान उभे करतात. गेल्या आठवड्यात हटविण्यात आलेल्या झोपड्या पुन्हा थाटल्या गेल्या असल्या तरी सध्या या अनधिकृत झोपड्यांकडे पालिकेच्या पंचवटी अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही.