पावसाळी नाल्यावर अतिक्रमण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:27+5:302021-01-02T04:12:27+5:30
सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी या परिसरात संपूर्ण शेती होती, तेव्हापासून शिव कॉलनी आणि राजीवनगर झोपडपट्टी लगत दोन नैसर्गिक पावसाळी नाले ...
सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी या परिसरात संपूर्ण शेती होती, तेव्हापासून शिव कॉलनी आणि राजीवनगर झोपडपट्टी लगत दोन नैसर्गिक पावसाळी नाले होते. हे नाले विविध सोसायटी व कॉलनीतून गेले आहेत. परिसरात कॉलनी व सोसायट्या वाढत गेल्या, त्यामुळे पावसाळी नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरून नये, म्हणून सिमेंट काँक्रिटचा पावसाळी नाला तयार करण्यात आला. शिव कॉलनीतील पावसाळी नाल्यावर अतिक्रमण करून त्यावर सुमारे सात इमारतींचे वाहनतळ व रुग्णालयाची इमारत उभी करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळी नाल्यातील नैसर्गिक स्रोत बंद करण्यात आल्याने नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. पावसाळी नाल्यांवर दिवसागणिक बांधकाम वाढत आहे. नागरिकांनी अनेक वेळेस महापालिका प्रशासनाला तक्रार करूनही पावसाळी नाल्यावर केलेल्या अनधिकृत बांधकामावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.