अतिक्रमण हटले; पुनर्विकास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:40 AM2017-09-14T00:40:46+5:302017-09-14T00:41:30+5:30
नेहरू उद्यान : सहा महिन्यांत बदलणार रुपडे नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १३) सकाळी नेहरू उद्यानातील बहुचर्चित खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविले आणि लगोलग उद्यानाच्या पुनर्विकासाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यामुळे मार्च २०१८ अखेर नेहरू उद्यानाचे रुपडे बदलणार आहे.
नेहरू उद्यान : सहा महिन्यांत बदलणार रुपडे
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १३) सकाळी नेहरू उद्यानातील बहुचर्चित खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविले आणि लगोलग उद्यानाच्या पुनर्विकासाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यामुळे मार्च २०१८ अखेर नेहरू उद्यानाचे रुपडे बदलणार आहे.
दीर्घ काळापासून नेहरू उद्यानातील अतिक्रमणाचा प्रश्न भिजत पडला होता. नेहरू उद्यानातील जागेचा कब्जा चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाºया व्यावसायिकांनी घेतला होता. या व्यावसायिकांना राजकीय पाठबळ लाभल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईत महापालिकेला अडथळे निर्माण होत होते. त्यातच, अगोदर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजपात दाखल झालेल्या एका राजकीय नेत्याचा वरदहस्त लाभल्याने संबंधित व्यावसायिकांची मुजोरीही वाढीस लागलेली होती. याच उद्यानात संबंधित नेत्याने स्थापन केलेल्या संघटनेचा फलक उभारण्यात आला होता. असा होणार पुनर्विकास!नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासासाठी स्मार्ट सिटी कंपनीने निधी देऊ केला आहे. त्यासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च येणार आहे. स्कायलर कन्स्ट्रक्शन या मक्तेदाराला पुनर्विकासाचे काम देण्यात आले असून, त्यात प्रामुख्याने अत्याधुनिक पद्धतीचे विद्युतीकरण, सुशोभीत पाथवे, शोभिवंत झाडे, कर्बवॉल, अत्याधुनिक पद्धतीची आसनव्यवस्था, आकर्षक कारंजे आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मक्तेदाराला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून, मार्च २०१८ अखेर उद्यान कात टाकणार आहे.