देवळाली कॅम्पला अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:18 AM2018-12-29T00:18:44+5:302018-12-29T00:19:36+5:30

छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.

 Encroachment removed from Deolali Camp | देवळाली कॅम्पला अतिक्रमण हटविले

देवळाली कॅम्पला अतिक्रमण हटविले

Next

देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.  छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी वडनेररोड येथील हॉटेल शारदाजवळील प्रमोद मोजाड यांचे पत्र्याचे शिवसेना कार्यालय जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. तसेच शेजारील दोन अनधिकृत रेडिमेड कपडे विक्रीचे पत्र्याचे दुकानदेखील जमीनदोस्त करण्यात आले. तसेच हिरा हॉटेलचे अनधिकृत पाठीमागील स्वच्छतागृहदेखील जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. छावणी प्रशासनाकडून संबंधित अनधिकृत दुकानदारांना यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या.
कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी मोहीम छावणी प्रशासनाने सुरू केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. छावणी प्रशासनाकडून ज्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यास सुरुवात केली आहे. सिंधी पंचायत कार्यालयासमोरील अतिक्रमणधारकास अतिक्रमण काढून घेण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे आर. सी. यादव यांनी सांगितले. या अतिक्रमण मोहिमेत एक जेसीबी, दोन वाहन वीस कर्मचारी सहभागी झाले होते.
छावणी प्रशासनाकडे तीन नगरसेवकांच्या अतिक्रमणाबाबत तक्रार करण्यात आली होती. छावणी परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षांनी संबंधित नगरसेवकांशी पत्रव्यवहार करून खुलासा मागवण्यात आला होता. मात्र तत्कालीन अध्यक्षांच्या बदलीनंतर त्याकडे छावणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली होती. ज्या तीन नगरसेवकांचे अतिक्रमण आहे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे म्हणून पराभूत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Web Title:  Encroachment removed from Deolali Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.