दिंडोरीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:40 PM2017-09-11T23:40:18+5:302017-09-11T23:40:39+5:30

नाशिक-कळवण रस्त्यावरील दिंडोरी शहरातील अतिक्रमणे काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक. दिंडोरी : नाशिक-कळवण व पालखेड रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र .१ च्या वतीने मोहीम राबविण्यात आली . किरकोळ वाद वगळता मोहीम सुरू असली तरी पालखेड रोडवरील व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याने, अन्यायग्रस्त व्यावसायिकांनी आमदार नरहरी झिरवाळ, प्रांताधिकारी उदय किसवे यांची भेट घेऊन पर्यायी जागा मिळावी अशी मागणी केली. त्यामुळे पालखेड रोडवरील अतिक्र मण मोहीम तूर्तास थांबविण्यात आली आहे.

The encroachment on the road to Dindori was deleted | दिंडोरीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

दिंडोरीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

Next

दिंडोरी : नाशिक-कळवण व पालखेड रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र .१ च्या वतीने मोहीम राबविण्यात आली . किरकोळ वाद वगळता मोहीम सुरू असली तरी पालखेड रोडवरील व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याने, अन्यायग्रस्त व्यावसायिकांनी आमदार नरहरी झिरवाळ, प्रांताधिकारी उदय किसवे यांची भेट घेऊन पर्यायी जागा मिळावी अशी मागणी केली. त्यामुळे पालखेड रोडवरील अतिक्र मण मोहीम तूर्तास थांबविण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार, दिंडोरी शहरातील अतिक्रमणे हटाविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागच्या वतीने संबधितांना नोटिसा बजाविल्या होत्या. काही व्यवसायिकांनी स्वत:हून अतिक्र मण काढून घेतले; परंतु नोटिस बजावूनही अतिक्र मणे न हटविल्याने सोमवारी ( दिं.११ ) सकाळी १० वा. पोलिस बंदोबस्तात येथील बस स्थानकापासून अतिक्र मण हटाव मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली. नाशिक -कळवण मार्गावरील अतिक्रमण्े काढण्यास सुरूवात करताच काही व्यवसायिकांनी स्वत:हून टपरी, दुकाने काढण्यास सुरूवात केली. परंतु काही व्यवसायिकांनी दुकान स्वत:हून काढतो, काही वेळ देण्याची मागणी केर्ली मात्र मोहीम सुरूच राहिल्याने वाद झाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले . तरी पालखेड रोडवरील व्यावयायिकावर अन्याय होत असल्याने पर्यायी जागा उपलब्ध करून द्या तर दुकानं हटवा अशी भूमिका घेत थेट पालकमंत्री गिरिश महाजन ,आमदार नरहरी झीरवाळ यांची भेट घेवून अतिक्र मण मोहिम थांबविण्याची मागणी केली आहे. दिवसभर सुरू असलेल्या मोहिमे नंतर पालखेड रोडवरील मोहिम तुर्तास थांबविण्यात आली. जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, तहसिलदार व संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या समवेत आमदार नरहरी झिरवाळ व व्यावसायिक यांच्या महत्त्वपूर्णं बैठकी नंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर गावित यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाडवी, पाटील, हवालदार आव्हाड, गायकवाड, वाघ आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.मोहिमेला या पूर्वीच स्थगितीदिंडोरीत पालखेड रोडवरील अतिक्र मणे काढण्यात येणार होते; मात्र या रस्त्यालगत काही घरे, दुकाने खूप जुनी आहेत, तर काही टपºया पन्नास वर्षांपासून आहेत. यापूर्वी जेव्हा अतिक्रमण मोहीम हाती घेतली तेव्हा काही ग्रामस्थ न्यायालयात गेले होते व सदर मोहिमेला स्थगिती मिळाली होती. सदर स्थगिती अद्याप कायम असल्याची बाब तसेच जुन्या व्यावसायिकांचे पुनर्वसन या बाबीवर अधिकाºयांसमवेत बैठक होत सदर रस्त्याची मोजणी होऊन नंतर निर्णय घेण्याचे ठरल्याने पालखेड रोडची मोहीम तात्पुरती स्थगित झाली.पालखेड रोडवरील सर्व व्यावसायिक अनेक वर्षांपासून पंचायतीची रीतसर परवानगी घेऊन व्यवसाय करत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आम्ही आमची न्यायिक भूमिका मांडली, त्यास प्रशासनाने सहकार्य केले तर व्यापारीही त्यांना सहकार्य करतील.
- सुनील आव्हाड, तालुकाध्यक्ष इंदिरा काँग्रेस

Web Title: The encroachment on the road to Dindori was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.