शाहीमार्गावरील अतिक्रमण हटविले

By admin | Published: June 15, 2015 11:59 PM2015-06-15T23:59:20+5:302015-06-16T00:01:06+5:30

पुरोहित संघाचे कार्यालय हटविले; काही काळ तणाव

The encroachment on the royal road has been removed | शाहीमार्गावरील अतिक्रमण हटविले

शाहीमार्गावरील अतिक्रमण हटविले

Next

पंचवटी : दोन महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा असून, शाहीमार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे काम मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. त्यातच पुरोहित संघाच्या ताब्यात असलेले वस्त्रांतरगृह तसेच पुरोहित संघाचे कार्यालय हटविण्यासाठी काही विशिष्ट महंत आणि पालिका पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मागणीवरून पुरोहित संघाच्या कार्यालयावर हातोडा पडणार असे मानले जात होते आणि प्रत्यक्षात तसेच घडले.
सकाळी १० वाजता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कडेकोट पोेलीस बंदोबस्तात हजर झाले. त्यानंतर रामकुंडालगत पुरोहित संघाने आपल्या कार्यालयाजवळ असलेल्या पायऱ्यांवर उभारलेल्या शेडचे पत्रे पथकाने हटविले. तत्पूर्वी पुरोहित संघाने शेडचे पत्रे काढून घेत शेडसाठी उभारलेले लोखंडी पाइप काढण्याचे काम सुरू केले होते; मात्र सकाळी अतिक्रमण पथकाने थेट रामकुंडावर धाव घेत लोखंडी पाइप गॅस कटरच्या सहाय्याने काढून घेण्याच्या कामाला सुरुवात केली त्यावेळी अनेकांनी विरोध दर्शविला मात्र प्रशासनाने पोलीस बळाचा वापर केल्याने जमावाला शांत बसावे लागले. त्यानंतर पथकाने गंगा गोदावरी मंदिराजवळील पुरोहित संघाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. त्यावेळी पुरोहितांनी विरोध केला. ही खासगी जागा असल्याचा दावा करीत तशी कागदपत्रे त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक पुरोहितांनी कार्यालयात ठाण मांडले असताना जेसीबीने शेड हटविण्यात आले. त्यामुळे अनेक पुरोहित जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत पुरोहितांना हटविले आणि त्यानंतर शेडही हटविले.
यावेळी पुरोहित संघाचे पदाधिकारी संतप्त झाले व त्यांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून जवळच बांधलेली रामकुंड पोलीस चौकी अतिक्रमणात असून, तीदेखील हटविण्याची मागणी केली; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत वाढीव बांधकाम व ओट्यांचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू ठेवले. याचवेळी एका युवकाने पथकावर दगडफेक केल्याने पोलीस संतप्त झाले आणि त्यांनी युवकाला ताब्यात घेतले. यावेळी वस्त्रांतरगृहाच्या समोर असलेल्या, तसेच नदीकाठच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाभिक व्यावसायिकांच्या टपऱ्या व यशवंतराव महाराज समाधी मंदिर, ढगे महाराज समाधी मंदिर परिसरात असलेल्या टपऱ्या, तसेच ओट्यांचे बांधकाम काढण्याचे काम केले. (वार्ताहर)

Web Title: The encroachment on the royal road has been removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.