नाशिकरोड परिसरातील अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:30 PM2018-12-16T22:30:25+5:302018-12-17T00:22:32+5:30
अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने शनिवारी नाशिकरोडला दोन प्रकरणांमध्ये बारा अनधिकृत बांधकामे हटविली. नाशिकरोड गुरुद्वारामागील श्री आकृती सोसायटी येथील राजेश पर्सिया (ओम प्लायवूड) यांचे इमारतीच्या सामासिक अंतरातील दुकाने पत्रे, शेड व पार्किंग जागेतील प्लायवूड साठा व तारेचे कुंपण हटविण्यात आले.
नाशिकरोड : अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने शनिवारी नाशिकरोडला दोन प्रकरणांमध्ये बारा अनधिकृत बांधकामे हटविली.
नाशिकरोड गुरुद्वारामागील श्री आकृती सोसायटी येथील राजेश पर्सिया (ओम प्लायवूड) यांचे इमारतीच्या सामासिक अंतरातील दुकाने पत्रे, शेड व पार्किंग जागेतील प्लायवूड साठा व तारेचे कुंपण हटविण्यात आले. श्रीकृष्ण कन्सल्टंट सर्व्हिसेसचे शेड व लोखंडी गेटचे बांधकाम हटविण्यात आले. दत्तमंदिररोडवरील आनंदभक्ती संकुल येथील श्याम दळवी (अर्णव फॅमिली रेस्टॉरंट) यांचे फोल्डिंग रूफ व कम्पाउंंडचे अनधिकृत बांधकाम, आशा खाडे (बावरी कलेक्शन) यांचे शेडचे बांधकाम, शारदा कटारनवरे (माँजिनीस केक शॉप) यांचे शेड, साइड मार्जिनमधील जाळी व शटरचे बांधकाम, संतोष टाके व लक्ष्मीकांत टाके (मॅक्स फोटो स्टुडीओ) यांचे शेडचे बांधकाम हटविण्यात आले.
आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात आली. सहाही विभागांमध्ये ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक आदी ठिकाणी अतिक्रमित भाजी-फळ विक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व व्यावसायिक यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमित बांधकामे काढून घ्यावीत, असे महापालिकेने कळविले आहे.