पाण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हटवले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 05:04 PM2019-06-22T17:04:56+5:302019-06-22T17:08:26+5:30
श्रीरामपूर : शिवगंगा नदीपात्रातील बंधाऱ्याने सुटणार पाणीप्रश्न
देवळा : आपल्या गावाचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी गावातील भाऊबंदकी, गटतटाचे राजकारण दूर ठेवत सर्व ग्रामस्थांनी एकत्र येउन स्वयंस्फूर्तीने नदीतील २ कि.मी.वरील अतिक्र मणे दूर करून तालुक्यातील श्रीरामपूर (वाखारवाडी) येथील ग्रामस्थांनी आदर्श घडविला आहे.
देवळा तालुक्यातील श्रीरामपूर हे सततच्या दुष्काळाने होरपळलेले गाव. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींनी तळ गाठलेला. तीव्र पाणीटंचाईमुळे गावातील त्रस्त झालेले ग्रामस्थ. यामुळे गावात शासकीय टँकरने नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अशी परिस्थिती असतांना गावातील शिवगंगा नदीवर ठिकठिकाणी के. टि. वेअर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती. कामास हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर नदीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण झालेले असल्यामुळे बंधारा बांधणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गांवकरी देखील विचारात पडले. परंतु हे अतिक्र मण काढणे एवढे सोपे नव्हते. वाखारी गावाची शीव ते मालेगाव रोड पर्यंत दोन ते अडीच कि.मी लांबीच्या नदीकाठावर दोन्ही बाजूंनी ५० ते ६० शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण केल्यामुळे नदीपात्र खूप अरूंद झाले होते. हया पात्रातूनच शिवारातील शेतक-यांचा येण्याजाण्याचा रस्ता होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते नदीतील अतिक्र मण काढण्याचा ठराव केला व शासनाकडे तशी मागणी केली. शासनाने याची दखल घेउन जेसीबी यंत्रणा मदतीसाठी दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते शासकीय नियमाप्रमाणे नदीतील अतिक्र मण काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी