भगूर उड्डाण पुलास अखेर मुहूर्त

By admin | Published: October 2, 2015 10:42 PM2015-10-02T22:42:36+5:302015-10-02T22:43:44+5:30

भगूर उड्डाण पुलास अखेर मुहूर्त

At the end of the Bhagur flyover, the muhurat | भगूर उड्डाण पुलास अखेर मुहूर्त

भगूर उड्डाण पुलास अखेर मुहूर्त

Next

नाशिकरोड : भगूर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलास अखेर मुहूर्त लागला असून, येत्या १८ महिन्यांत रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाचे काम पूर्ण होणार आहे.
भगूर रेल्वे क्रॉसिंग येथे उड्डाण पूल उभारण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीतून माजी खासदार समीर भुजबळ यांनी २४ जानेवारी २०१४ रोजी २७ कोटी ४० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली होती. मात्र रेल्वे, केंद्र, राज्य शासन यांच्या विविध परवानग्यांमुळे गेल्या दीड वर्षापासून उड्डाण पुलाची निविदाप्रक्रिया व इतर काम रखडले होते. खासदार हेमंत गोडसे यांनीही या प्रकरणी मंत्र्यालयात चर्चा केली होती. पूल उभारण्याची निविदा गेल्या आठ दिवसांपूर्वीच देण्यात आली असून, येत्या १८ महिन्यांत उड्डाण पुलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश त्यात देण्यात आलेले आहे. या पुलामुळे भगूर, विजयनगर, विंचूरदळवी, दोनवाडे, वडगाव पिंगळा, नानेगाव, पांढुर्ली तसेच घोटी-सिन्नर या मार्गाला जोडणारा रस्ता व त्यावरील वाहतूक या सर्वांना दैनंदिन दळणवळणासाठी हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: At the end of the Bhagur flyover, the muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.