स्वच्छ सर्वेक्षण संपताच सातपूर भागात अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:00 PM2020-02-07T23:00:05+5:302020-02-08T00:02:44+5:30

महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान सर्वेक्षण केवळ देखावा नसावा तर कायमस्वरूपी असावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असा सल्ला सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभाग बैठकीत अधिकाºयांना देण्यात आला.

At the end of the clean survey, the unclean areas of Satpur | स्वच्छ सर्वेक्षण संपताच सातपूर भागात अस्वच्छता

स्वच्छ सर्वेक्षण संपताच सातपूर भागात अस्वच्छता

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभाग सभा : सर्वपक्षीय नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांबद्दल नाराजी

सातपूर : महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान सर्वेक्षण केवळ देखावा नसावा तर कायमस्वरूपी असावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असा सल्ला सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभाग बैठकीत अधिकाºयांना देण्यात आला.
सातपूर प्रभागाची बैठक सभापती संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शहरात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण राबविण्यात येत असताना सातपूर विभागात मात्र कुठेही स्वछता मोहीम राबवित असताना आढळून येत नसल्याबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात तरी चांगली कामे होत होती. आता कुठेही कोणीही काम करीत नसल्याचा आरोप भागवत आरोटे यांनी केला. प्रभागातील पथदीपांवरील जुने दिवे काढून कमी उजेड देणारे दिवे लावून ठेकेदारांचे हित जोपासले जात असल्याचा आरोप सलीम शेख यांनी केला. मनपा मायको रुग्णालय परिसरात भटक्या श्वानांचे प्रस्थ वाढले असून, त्याचा रु ग्णांना त्रास होत असल्याची कैफियत मांडली. सातपूर गावातील अनधिकृत भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण हटविण्याची मागणी योगेश शेवरे यांनी केली. रवींद्र धिवरे, नयना गांगुर्डे, माधुरी बोलकर, हर्षदा गायकर, मधुकर जाधव, विजय भंदुरे, दशरथ लोखंडे आदींनी विविध समस्या सोडविण्याची मागणी केली. परिसरात स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करताना आढळले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, सातपूर गावातील अतिक्र मण हटविण्यासाठी महिनाभर पोलीस बंदोबस्तात मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच अधिकाºयांनी त्यांची कामे प्रामाणिकपणे करावीत, असे निर्देश सभापती संतोष गायकवाड यांनी दिले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक मधुकर जाधव यांच्या सभागृहाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड, अभियंता संजय पाटील, रवी पाटील, श्याम वाईकर, नितीन राजपूत, माधुरी तांबे, डॉ. रु चिता पावसकर आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.
प्रभाग क्र मांक ८ मध्ये सुमारे २० लाख रु पयांची पावसाळी गटार टाकणे विविध प्रभागांतील उद्यानांमध्ये सुमारे ३० लाख रु पये खर्चाचे व्हिटेज, व्हिक्टोरिया बेंचेस आणि खेळणी बसविण्याच्या कामासह ५८ लाख रु पयांच्या विविध विकासकामांना प्रभाग समितीच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

Web Title: At the end of the clean survey, the unclean areas of Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.