डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 07:33 PM2020-10-22T19:33:09+5:302020-10-23T00:01:44+5:30

नाशिक : सततच्या पावसाच्या सोबतीलाच अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे झालेले अतोनात नुकसान तर,दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला होत असलेली वाढती मागणी त्यातच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सर्वत्र उपहारगृहे, खानावळी सुरु झाल्याने सध्या कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

By the end of December, the onion will be eaten | डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार

डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार

googlenewsNext
ठळक मुद्देमागणीत वाढ : अतिवृष्टीचा परिणाम, नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर

नाशिक : सततच्या पावसाच्या सोबतीलाच अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे झालेले अतोनात नुकसान तर,दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला होत असलेली वाढती मागणी त्यातच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सर्वत्र उपहारगृहे, खानावळी सुरु झाल्याने सध्या कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नविन कांद्याचा हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी सततचा पावसाबरोबरच परतीच्या मुसळधारेचा फटका कांद्याला बसल्यामुळे यंदा नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून डिसेंबर नंतरच नविन कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे .तोपर्यंत चांगल्या प्रतिच्या जुन्या कांद्याचे भाव वाढतच राहणार असून ही दरवाढ आणखीन महिनाभर तरी टिकून राहील असे जाणकार व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा कांद्याच्या उत्पादनाचे समिकरण विस्कटले आहे. साठवण केलेला उन्हाळी कांदा लॉकडाऊनच्या काळात सुरूवातीला माती मोल दरात विकणाºया कांदा उत्पादकांना गत महिन्यापासून बाजारात चांगल्या दराने विकण्याची वेळ आली असता,केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. याच साठवण केलेल्या कांद्यातील ७० टक्के कांदा वातावरण बदल तसेच पावसामुळे सडला. उवर्रीत कांद्यावर वर्षभराचे गणित जमवणाºया कांदा उत्पादकांचे गणित निर्यात बंदी मुळे विस्कटलेले आहे.अतिवृष्टी मुळे पावसाळ्यात लावलेली कांद्याची रोपे देखील तगू शकली नाही.परिणामी कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे काही काळ कांदा भाव खाणारच असे चित्र आहे.

हॉटेल्स सुरू झाल्याने दरवाढ
कळवण कृषि उत्पन्न समितीच्या अभोणा उपबाजार आवारात गत आठवडयात कांद्याचा क्विंटल दर सरासरी तीन हजार ५०० ते चार हजार २०० रुपये होता. परंतु सोमवारी (दि.१९) बाजारात अंदाजे ४५०० क्विंटल आवक झाली असता कांद्याला कमाल ८ हजार ८००, किमान दोन हजार ५०० तर सरासरी सहा हजार ५०० रुपये भाव मिळाला. मंगळवारी (दि.२०) बाजारात अंदाजे ३००० क्विंटल आवक होऊन कमाल ९ हजार ७०० ते आठ हजार ५०० ,किमान चार हजार ९१० ते दोन हजार ७०० तर सरासरी सात हजार ५०० ते सहा हजार ५०० रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला. बुधवारी (दि. २१ बाजारात अंदाजे ३५०० क्विंटल आवक होऊन कमाल नऊ हजार २०० तर किमान ४ हजार ५२० ते दोन हजार तर सरासरी सात हजार ते सहा हजार रूपये असा भाव मिळाला. उपहारगृहे, खानावळी सुरू झाल्याने कांदा मागणीत एकदम झालेली वाढ हेच कांदा दरवाढीमागचे प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: By the end of December, the onion will be eaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.