सैनिकांसाठी ‘आॅन डिमांड एक्झाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:29 AM2018-05-26T00:29:17+5:302018-05-26T00:29:17+5:30
मुक्त शिक्षणाची संधी देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने सेनादलातील महाराष्टÑातील जवानांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतानाच त्यांना त्यांच्या सोयीच्या कालावधीनुसार परीक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. ‘आॅन डिमांड एक्झाम’ अशी व्यवस्था विद्यापीठाने केली असून, आगामी वर्षापासून या सुविधेचा लाभ सैनिकांना घेता येणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली.
नाशिक : मुक्त शिक्षणाची संधी देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने सेनादलातील महाराष्टÑातील जवानांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतानाच त्यांना त्यांच्या सोयीच्या कालावधीनुसार परीक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. ‘आॅन डिमांड एक्झाम’ अशी व्यवस्था विद्यापीठाने केली असून, आगामी वर्षापासून या सुविधेचा लाभ सैनिकांना घेता येणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली. मुक्त विद्यापीठाच्या वतीने लष्करी जवान आणि पोलिसांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देतानाच त्यांना सोयीचे ठरले असे निर्णय घेतले आहेत. महाराष्टÑ पोलिसांसाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षेचे वेळापत्रक असणार आहे, तर सैनिकांना मात्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सवडीनुसार परीक्षा देण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्टÑातील सैनिकांना देशभर कुठेही सेवा करावी लागते. हे जवान जेव्हा सुटीवर आपल्या गावी येतात तेव्हा त्यांनी मागणी केल्यास त्यांच्यासाठी विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. बीए, बीकॉमसह अन्य अभ्यासक्रम पूर्ण करणाºया सैनिकी विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आॅनलाइन पद्धतीने सदर परीक्षा घेतली जाणार असल्याने महाराष्टÑातील कुठल्याही केंद्रातून जवान आपली परीक्षा देऊ शकणार आहे. मुक्त विद्यापीठात अनेक नामवंत साहित्यिकांचे अध्यासने आहेत. या अध्यासनांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. आता या साहित्यिकांच्या नावाने राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचा भाग म्हणून विद्यापीठाच्याच आॅडिओ व्हिज्युअल विभागाच्या माध्यमातून २० मिनिटांचा माहितीपट बनविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यामुळे अद्ययावत आणि प्रशस्त अशा आॅडिओ व्हिज्युअल विभागाची उपयुक्तता यामुळे वाढणार आहे. विद्यापीठाच्या विविध प्रसारणाची कामे या विभागाच्या माध्यमातून कशी करता येतील याबाबतची चाचपणीदेखील केली जात आहे. यासाठी अद्ययावत सॅटेलाइटसाठीचा करार देखील केला जाणार आहे. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषी संशोधन आणि प्रयोग केले जातात. याबाबत परिसरातील शेतकºयांना कृषी संशोधनाची माहिती देण्यासाठी ‘कृषिदूत’ निर्माण केले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे.
आधुनिक शेतीचे प्रशिक्षण
विद्यापीठात पाणी आणि माती परिक्षणाच्या अद्ययावत प्रयोगशाळा, फायटो डायग्नोस्टिक्स, पोस्ट हार्वेस्ट टेक प्रयोगशाळा आहेत. त्याचा वापर वाढविण्याबरोबरच विविध प्रकारचे वाण विकसित करण्याचे प्रयोग येथे सातत्याने केले जातात. त्याची यशोगाथा समाजासमोर येण्यासाठी देखील नियोजन करण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले. कृषी तंत्रज्ञान केंद्र सर्वसामान्यांसाठी खुले करण्याबाबत किंवा शेतकरीभिमुख होण्यासाठीचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या आवारात असलेल्या विस्तीर्ण वनराईत अनेक प्रकारची फळझाडे असून, त्यांच्या माध्यमातूनही विद्यापीठाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला आहे. येथील कर्मचाºयांनाही येथील नैसर्गिक शेतीच्या फळांचा आनंद घेता येतो. आंबा, फणस, नारळ यासारखे उत्पादन येथे घेतले जाते. विद्यापीठाने दोन गावे दत्तक घेतली असून, या योजनेद्वारे आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.