मनमाडला उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:20 PM2020-03-05T17:20:28+5:302020-03-05T17:21:03+5:30

केंद्र शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

End of Entrepreneurship Training Camp in Manmad | मनमाडला उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचा समारोप

मनमाड येथील उद्योजकता विकास शिबिराच्या समारोपप्रसंगी मुख्याधिकारी डॉ दिलिप मेणकर, संदीप आगोने आदी

Next

मनमाड : केंद्र शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लाभार्थ्यांना उद्योजकता विकासाचे महत्वाचे मुद्दे , उद्योग नोंदणी , प्रकल्प अहवाल , बँक लिंकेजेस , उद्योग धोरण , बँकेमार्फत वित्तीय सहाय्य , मार्केटिंग या विषयावर नाशिकच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामधील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचा समारोप पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.याप्रसंगी संदीप अगोने यांनी मार्गदर्शन केले .
 

Web Title: End of Entrepreneurship Training Camp in Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.