..अखेर गोदावरी कॉँक्रिटीकरणमुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:20 AM2019-05-01T00:20:52+5:302019-05-01T00:21:20+5:30
गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३०) स्मार्ट अधिकाऱ्यांसह गोदाघाट परिसराची पाहणी केली.
पंचवटी : गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३०) स्मार्ट अधिकाऱ्यांसह गोदाघाट परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी गोदापात्र कॉँक्रीटमुक्त करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असून, ती शिथिल झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
नाशिक शहरातून वाहणाºया गोदावरी नदीत रामकुंडाच्या ठिकाणी २००२-०३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी कॉँक्रीटीकरण करण्यात येणार असून, त्यामुळे कुंडातील नैसर्गिक नाले बंद झाल्याची नदीप्रेमींची तक्रार आहे. कॉँक्रिटीकरण काढण्याची अनेकदा मागणी झाली आहे, परंतु उपयोग होत नव्हता. आता मात्र स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रोजेक्ट गोदा प्रकल्प राबविण्यात येणार असून, विविध टप्प्यात होणाºया या कामाअंतर्गतच पात्र कॉँक्रिटीकरणमुक्त करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने प्रोजेक्ट गोदा अंतर्गत निविदा काढल्या आहेत. प्रोजेक्ट गोदाअंतर्गत रामवाडी पूल ते अहल्यादेवी होळकर पुलापर्यंतच्या गोदापात्रातील गाळ काढण्यात येणार असून, अहल्यादेवी होळकर पूल ते गाडगे महाराज पुलादरम्यानच्या टप्प्यात गोदाघाटाचे सुशोभिकरण केले जाणार आहे.
यात गोदापात्रातील कॉँक्र ीट हटवून पात्रातील झऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामांचाही समावेश आहे. या कामांसाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीचा भाग म्हणून आयुक्त गमे यांनी आज स्मार्ट कंपनीच्या अधिकाºयांसमवेत गोदाघाटाचा पाहणी दौरा केला.