यंदा रूसला वरूणराजा : गतवर्षी जुलैअखेर २९८ मिमी पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:12 PM2020-07-19T17:12:28+5:302020-07-19T17:13:36+5:30

भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. तरीदेखील जोरदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता अत्यंत कमी

At the end of July last year, 298 mm of rainfall | यंदा रूसला वरूणराजा : गतवर्षी जुलैअखेर २९८ मिमी पाऊस !

यंदा रूसला वरूणराजा : गतवर्षी जुलैअखेर २९८ मिमी पाऊस !

Next
ठळक मुद्देपंधरवड्यापासून ६७ मिमी पाऊस

नाशिक : शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जुनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्रीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरूणराजा रूसला असून अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची ओढ प्रत्येकाला लागली आहे. मेघ दाटून येत असले, तरी जोरदार सरींचे आकमन होत नसल्याने आता बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच वाढत्या आर्द्रतेमुळे वातावरणातील दमटपणा नागरिकांना घामाघुम करणारा ठरत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत शहरात असेच ढगाळ हवामान कायम राहणार असले तरी पावसाची खूप काही जोरदार हजेरी नसेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी कोकण किनारपट्टीसह मुबंईत जोरदार पाऊस झाला असला तरी शहरात मात्र हलक्या सरींचा वर्षाव झाला. या वीस दिवसांत शहरात केवळ ६७ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडे आहे.
गेल्यावर्षी जून कोरडाठाक गेला होता; मात्र जुलैत पावसाने ती कसर भरून काढली होती. ६ जुलै २०१९ रोजी त्या २४ तासांच ७० मिमी इतका उच्चांकी त्यामहिन्यातील पाऊस नोंदविला गेला होता. जुलैअखेर २९८.७८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गोदावरीही खळाळून वाहू लागल्याचे चित्र नाशिककरांनी बघितले होते. यंदा कोरोनामुळे वातावरणातील चैतन्य हरविले असताना दुसरीकडे पावसानेही दडी मारल्याने अधिक चिंता वाढली आहे. यावर्षी निसर्गाकडून फारशी कृपादृष्टी होत नसल्याचे सर्वांचेच मत झाले आहे. जूनपासून अद्याप ४३१ मिमीइतका पाऊस पडला आहे.

श्रावणसरींच्या वर्षावाकडे लक्ष
काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या पुर्नआगमनाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहे. श्रावणमासात बरसणाऱ्या मध्यम व दमदार सरींच्या वर्षावाकडे बळीराजासह सर्वच नागरिक लक्ष ठेवून आहे. भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. तरीदेखील जोरदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.


 

Web Title: At the end of July last year, 298 mm of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.