नवजात बछडे अखेर मादीच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 03:05 PM2018-12-03T15:05:15+5:302018-12-03T15:05:36+5:30
सिन्नर : मातेपासून विलग झालेल्या बछड्यांची मादीशी भेट घडवून आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास फळास आले.
सिन्नर : मातेपासून विलग झालेल्या बछड्यांची मादीशी भेट घडवून आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास फळास आले. तालुक्यातील सांगवी शिवारातील शरद घुमरे यांच्या उसाच्या शेतात शनिवारी दुपारी साडेबाराला उसतोड कामगारांना आढळून चार बछडे आढळून आले होते. बछड्यांच्या शोधार्थ रविवारी पहाटे मादी बाहेर पडली. त्यांना अलगद उचलून नेत उसाच्या शेतात गेली. तब्बल १७ तासांनी बिबट्याची मादी व बछड्यांची भेट झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. सांगवी येथील शरद घुमरे यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी उसतोड कामगारांना आढळलेल्या बछड्यांना जास्त हाताळले, त्याचबरोबर मानवी स्पर्श झाला. तर मादी त्यांना स्विकारणार नाही. शिवाय बछड्यांच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या बिबट्याच्या मादीस पिले आढळून न आल्यास ती अधिक आक्रमक झाली असती, अशी भीती वनविभागाच्या अधिकाºयांना होती. त्यांनी उसतोड कामगारांकडून ही बछडे ताब्यात घेत त्यांना अलगत प्लास्टीक कॅरेटमध्ये ठेवले. थंडीच्या कडाक्यात त्यांना ऊब मिळावी यासाठी कॅरेटच्या भोवती पाचट ठेवण्यात आले. शिवाय जवळ पिंजराही लावण्यात आला. बछड्यांना स्विकारले नाही तर मादी किमान पिंजºयात तरी येईल, असा कयास बांधला गेला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शरद थोरात, के. आर. इरकर, तानाजी भुजबळ, एम. व्ही. शिंदे यांनी घटनास्थळी तळ ठोकून होते. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बछड्यांच्या कॅरेटजवळ आलेल्या मादीने त्यांना उचलल्यानंतर उसाच्या शेतात घेवून गेली. बिबट्याच्या मायलेकरांची तब्बल १७ तासांनी भेट घडवून आणल्याचे समाधान वनविभागासह स्थानिक रविवाशांच्या चेहºयावर झळकत होते.