लासलगाव, इगतपुरी येथे वर्षावास समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:28 AM2018-10-26T00:28:37+5:302018-10-26T00:31:21+5:30

लासलगाव : भारतीय बौद्ध महासभा यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने लासलगाव राजवाडा येथील बुद्धविहार या ठिकाणी बौद्ध धर्मातील आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध आणि धर्मग्रंथ वाचन व धम्म प्रवचन कार्यक्रमाचा समारोप झाला.

End of rainy season at Lassalgaon, Igatpuri | लासलगाव, इगतपुरी येथे वर्षावास समाप्ती

लासलगाव येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित वर्षावास कार्यक्रमात सहभागी झालेले आरित भालेराव, कांचन साळवे, संगीता शेजवळ, प्रा. विजय भालेराव, रमेश कर्डक, दादाजी बागुल आदी.

Next
ठळक मुद्देविपश्यना चार्य भदन्त महास्थवीर यांनी धम्म व विपश्यना या विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.

लासलगाव : भारतीय बौद्ध महासभा यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने लासलगाव राजवाडा येथील बुद्धविहार या ठिकाणी बौद्ध धर्मातील आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध आणि धर्मग्रंथ वाचन व धम्म प्रवचन कार्यक्रमाचा समारोप झाला.
वर्षावास कालावधीमध्ये यशोधरा व रमाई महिला मंडळाच्या आरित भालेराव, कांचन साळवे यांनी ग्रंथांचे सविस्तर वाचन करून उपस्थित बांधवांना धम्म ग्रंथाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान, बुद्धमय राजे आदी विषयांवर केंद्रीय शिक्षक दौलतराव गायकवाड, केंद्रीय शिक्षक प्रकाश संसारे, श्यामराव साळवे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
सरपंच संगीता शेजवळ, प्रा. विजय भालेराव, रमेश कर्डक, दादाजी बागुल, राजेंद्र शेजवळ, तुळसा शेजवळ, निर्मला शेजवळ, सुशीला शेजवळ, रमा शेजवळ, रेखा गायकवाड, शालू गांगुर्डे, विठाई बनसोडे आदी उपस्थित होते. भारती शेजवळ, पद्मा शेजवळ, मनीषा शेजवळ, प्रियंका निरभवणे, आशा शेजवळ, शैला आहिरे, कविता शेजवळ, वैशाली शेजवळ, अविता शेजवळ, प्रीती शेजवळ आदींनी परिश्रम घेतले. आदर्श शिक्षक सूरज झाल्टे यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक आरती भालेराव यांनी तर सूत्रसंचलन प्रकाश संसारे, आभार भारती शेजवळ यांनी मानले.इगतपुरीत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना इगतपुरी : मानव हिताच्या दृष्टीने जगाला शांती व समानतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची धम्मसाधना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील सर्वोदय बुद्धविहारात सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक तसेच धम्म संघाचे विविध कार्यक्र म राबविण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावास व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथ वाचनाची सांगता करण्यात आली. यावेळी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नगराध्यक्ष संजय इंदूलकर, उपनगराध्यक्ष नईम खान यांच्या हस्ते संविधान स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ अकोला येथील विपश्यना चार्य भदन्त महास्थवीर यांनी धम्म व विपश्यना या विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी परिसरात बुद्धमूर्तीची स्थापना भदन्त महास्थवीर यांच्या हस्ते विधिवत करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विविध धम्म, सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक कार्यक्र म झाल्यानंतर भोजनदान, खीरदान करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्र माचे आयोजक सर्वोदय उपासिका संघ, सर्वोदय तरुण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, तसेच बौद्ध उपासक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन बांधकाम सभापती सीमा जाधव यांनी केले.

Web Title: End of rainy season at Lassalgaon, Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक