‘शेल्टर एक्स्पो’चा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:19 AM2019-12-23T01:19:12+5:302019-12-23T01:20:09+5:30
शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शेल्टर प्रदर्शनाला नाशिक शहर व जिल्ह्यासह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र व मुंबई पुण्यातील सुमारे साठ हजारहून अधिक नागरिकांनी हजेरी लावून आपल्या स्वप्नातील घराच्या विविध पर्यांची चाचपणी केली. तर सुमारे पाचशे ग्राकांनी शेल्टरच्या माध्यमातून आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले.
नाशिक : शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शेल्टर प्रदर्शनाला नाशिक शहर व जिल्ह्यासह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र व मुंबई पुण्यातील सुमारे साठ हजारहून अधिक नागरिकांनी हजेरी लावून आपल्या स्वप्नातील घराच्या विविध पर्यांची चाचपणी केली. तर सुमारे पाचशे ग्राकांनी शेल्टरच्या माध्यमातून आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. या चार दिवसांच्या कालावधीत शेल्टरमध्ये सुमारे दिडशे कोटींची उलाढाल झाली असून शेल्टरमधून विविध गृहप्रकल्पांची पाहणी करणाऱ्या ग्राहकांकडून शहरातील नाशिकमध्ये घर खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याने येत्या तीन महिन्यात तीन हजारहून अधिक सदनिकांची विक्री होईल असा विश्वास क्रेडाईन नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील डोंगरे वस्तीगृह मैदानावर गेल्या चार दिवसांपासून सुरू दिमाखदार ‘शेल्टर २०१९ प्रॉपर्टी एक्स्पो’ चा रविवारी (दि.२२) समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, उपमहापौर भिकूबाई बागुल, आमदार प्रा. देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, माजी खासदार प्रतापदादा सोनावणे, क्रेडाईचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारीख, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे संचालक जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, प्रदर्शनाचे समन्वयक रवि महाजन व सहसमन्वयक कृणाल पाटील उपस्थित होते. वैभवशाली वारसा लाभलेल्या नाशिक शहराची कनेक्टीव्हिटी वाढली असून शहराच्या विकासासाठी तसेच ब्रांन्डींगसाठी नाशिककर जनता, उद्योजक व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास निश्चित उद्दिष्ट साधता येईल. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची अशी ग्वाही समारोप सोहळ््यासाठी उपस्थित लोकप्रतीनिधींनी यावेळी आयोजकांना दिली. त्याचप्रमाणे क्रेडाई खºया अर्थाने नाशिक शहराच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून काम करीत असल्याचेही लोकप्रतिनिधींनी नमूद केले. ‘शेल्टर २०१९ प्रॉपर्टी एक्स्पो’च्या संयोजन समितीचे अनिल आहेर, अतुल शिंदे, हितेश पोतदार, ऋषिकेश कोते, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर, सचिन चव्हाण, अंजन भलोदिया, गौरव ठक्कर, राजेश पिंगळे, भाग्यश्री तलवारे, शुभम राजेगावकर, श्रेणिक सुराणा, मनोज खिंवसरा आदी सदस्यांनी शेल्टर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उपस्थितांचे शेल्टरचे सहसमन्वयक कृणाल पाटील यांनी आभार मानले.
अर्थकारणात सकारात्मक बदल
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी नाशिक शहरांसाठी विमानसेवा, टायर बेस मेट्रो, युनिफाईड डीसीपीआर यांच्या पूर्ततेकडेही उपस्थित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधतानाच शहर हीच आमची प्राथमिकता आहे असेही त्यांनी नमूद केले. त्र्यंबकेश्वर विकास, रामायण सर्किट अशा अनेक विकासाच्या योजनाही प्रस्तावित असून स्वच्छ हवामानाच्या नाशिककडे सर्वांचेचे लक्ष असल्याने तसेच शेल्टरच्या यशामुळे शहराचा अर्थकारणात सकारात्मक बदल होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.