विजेचे स्थिर आकार रद्द करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:14 PM2020-08-12T23:14:46+5:302020-08-12T23:57:20+5:30
सातपूर : वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तर स्थिर आकार रद्द करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री राऊत यांनी दिल्याची माहिती चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

वीजदरासंदर्भात राज्यातील व्यापारी-उद्योजकांच्या अडचणींबाबत कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. यावेळी वीजबिलासंदर्भातील व्यापारी-उद्योजकांच्या अडचणी मांडण्यात आल्या. वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी, मराठवाडा व विदर्भाकरिता जाहीर केलेली सबसिडी त्वरित देण्यात यावी, वस्रोद्योगासाठी जाहीर केलेली वीजबिलाची सवलत पूर्वलक्षी पद्धतीने फेब्रुवारी २०१८ पासून देण्यात यावी. राज्यातील विजेचे दर शेजारील राज्यापेक्षा जास्त असल्याने उद्योगांना स्पर्धा करणे कठीण होते त्यामुळे वीजदर कमी करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच एप्रिल २०२० पासून लागू केलेल्या वीजदरवाढीच्या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. ऊर्जामंत्री राऊत यांनी स्थिर आकार रद्द करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
यावेळी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, राजीव पाटील, सचिन शिरगावकर, रणजित शहा, मोहन गुरनानी, भावेश मानेक, सागर नागरे आदी उपस्थित होते.