निसर्ग संर्वधनासाठी ऊर्जा, जल, वृक्ष संवर्धन ही त्रिसुत्री आवश्यक: उमाकांत निखारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 09:13 PM2019-08-17T21:13:01+5:302019-08-17T21:15:27+5:30

नाशिक - शासनाच्या औष्णिक वीज केंद्रात खरे तर पर्यावरणाची गरज असतेच. परंतु त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी विरळच. सध्या या भागात मियावाकी पध्दतीने रोपे लावून हा परिसर हिरवागार करतानाच त्यांनी परीसरात घन कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे काम त्यांनी केले आहे. आपली वसाहत सुंदर वसाहत तसेच माझा कचरा माझी जबाबदारी अशा संकल्पना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियातही रूजवल्या आहेत. राज्यशासनाच्या पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्काराने गौरवांकित केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्याशी साधलेला संवाद...

Energy, water, tree conservation is essential for conservation of nature: Umakant Nikhhare | निसर्ग संर्वधनासाठी ऊर्जा, जल, वृक्ष संवर्धन ही त्रिसुत्री आवश्यक: उमाकांत निखारे

निसर्ग संर्वधनासाठी ऊर्जा, जल, वृक्ष संवर्धन ही त्रिसुत्री आवश्यक: उमाकांत निखारे

Next
ठळक मुद्दे मियावाकी पध्दत चांगलीचकचरा ही आपलीच जबाबदारीआपला परीसर स्वच्छ परिसर संकल्पनेची गरज

नाशिक - शासनाच्या औष्णिक वीज केंद्रात खरे तर पर्यावरणाची गरज असतेच. परंतु त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी विरळच. सध्या या भागात मियावाकी पध्दतीने रोपे लावून हा परिसर हिरवागार करतानाच त्यांनी परीसरात घन कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे काम त्यांनी केले आहे. आपली वसाहत सुंदर वसाहत तसेच माझा कचरा माझी जबाबदारी अशा संकल्पना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियातही रूजवल्या आहेत. राज्यशासनाच्या पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्काराने गौरवांकित केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्याशी साधलेला संवाद...


प्रश्न :पर्यावरण संवर्धन या विषयात रूची कशी काय निर्माण झाली?
निखारे : माझे बालपण आणि शिक्षण हे सर्वच निसर्गाच्या कुशीत झाले. वडील श्रीराम निखारे वनखात्यात होते. त्यांची चंद्रपूरला चांदा वेस्ट येथे नियुक्ती होती.त्यानंतर माझी शाळा आणि अन्य सर्व निसर्ग सानिध्यातच होते. ताडोबा येथील पस्तीस घराच्या परीसरातही होतो. घराच्या परसात असलेल्या फुल झाडांनी निसर्गाकडे अधिक ओढलो गेलो आणि त्यातूनच मग एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तेथेही वृक्षरोपण आणि कचरा व्यवस्थापन अशा प्रकारचे पर्यावरण पुरक काम करता आले.

प्रश्न : मियावाकी पध्दतीचे वृक्षारोपण कसे अमलात आणले ?
निखारे : जानेवारी २०१७ पासून नाशिक औष्णिक वीज केंद्रात मुख्य अभियंता म्हणुन रु जु झाल्यावर केंद्र परिसरात मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण केले. १ एप्रिल २०१९ ला करु न एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कुल करण्यासाठी संकल्प २०१९अंतर्गत मियावाकी या जापनीज पध्दतीने ४७०० चौरसफुट जागेत २ बाय २ फुटाच्या अंतराने ४६ स्थानिक प्रजातिच्या एकुण ११०० झाडांची लागवड करण्यात आली. या पद्धतीने झाडांची वाढ जलद गतीने होते व ३० पट घनदाट जंगल तयार होते. त्यामुळे ३० टक्के पर्यंत कार्बनडाय आॅक्साईड शोषुन घेतला जातो.पर्यावरण संवर्धनासाठी व्रुक्षांच्या रोपांची मोठ्या प्रमाणात गरज भासते म्हणुन एकलहरे वसाहती मधील स्थापत्य विभागात १७ हजार ६८६ विविध प्रकारची रोपे तयार करणारी रोपवाटीका विकिसत करण्यात आली.


प्रश्न : हा परिसवरच पर्यावरण स्नेही कसा केला?
निखारे: मी केंद्रात रूजु झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या काळात पीस पार्क उद्यानाचे रु पडे पालटले.कमीत कमी संसाधनांमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ असे लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींसाठी व्यायाम मनोरंजनाची साधने उपलब्ध करु न दिली.स्वच्छता अभियानाची प्रभावीपणे अंमल बजावणी करु न प्लास्टिकमुक्त केंद्र व रहिवासी वसाहत, शुन्य कचरा प्रकल्प अभियान राबविले. सुका कचरा व ओला कचरा वेगळा करु न योग्य व्यवस्थापण करण्यासाठी सुका कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले.ओला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी घरच्या घरी खत बनविणारे मॅजिक बॉक्स वापरण्यापाठी कर्मचारी व रहिवाशांना प्रोत्साहित केले.प्लास्टिकमुक्त अभियानासाठी प्लास्टिकला पर्याय म्हणुन कापडी पिशव्या बनवुन मोफत वितरीत केल्या.कापडी पिशव्या बनविण्यासाठी जुने कपडे, साड्या संकलन केंद्र उभारले.त्याचबरोबर इ-वेस्ट संकलन केंद्रही उभारले.हे सर्व करत असतांना एकलहरे वीज केंद्र हे शुन्य गळती केंद्र म्हणुन उपाययोजना सुरु केली.पाणी, कोळसा, आॅईल, वाफ, हवा, सांडपाणी यांची गळती शुन्य करण्याचे ध्येय ठेऊन काम केले.
प्रश्न : आपल्या कार्याची दखल विविध स्ततरावर कशी घेतली गेली?
निखारे: २०१७-१८ मध्ये महानिर्मिती मध्ये नाशिक औष्णिक विद्युत केंद्राला उत्कृष्ट तांत्रिक कामिगरी बद्दल द्वितीय क्र मांक पटकावला तर स्वच्छता अभियानात प्रथम क्र मांकावर राहून महानिर्मितीचे रोल मॉडेल ठरले आहे. महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळ आयोजित पर्यावरण विषयक वसुंधरा लघु चित्रपट स्पर्धा २०१९ या स्पर्धेत नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचा लाईफलाईन मिटस् लाईफ या लघु चित्रपटाला हौशी गटात प्रथम क्र मांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे व मुख्य अभियंता म्हणून मला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख रु पयांचा धनादेश स्वरु पात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुलाखत: शरदचंद्र खैरनार


 

Web Title: Energy, water, tree conservation is essential for conservation of nature: Umakant Nikhhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.