अभियांत्रकी पदविकेच्या परीक्षा तत्काळ घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:14 PM2020-08-19T23:14:12+5:302020-08-20T00:23:36+5:30
नाशिक : तृतीय वर्ष पदविका परीक्षे संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.अशातच जून महिन्यापासूनच द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे आॅनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. यामुळे पदवीके नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडणार आहे.
नाशिक : तृतीय वर्ष पदविका परीक्षे संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.अशातच जून महिन्यापासूनच द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे आॅनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. यामुळे पदवीके नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे द्वितीय अभियांत्रिकीच्या प्रथम सत्राच्या परीक्षेला अचानक सामोरे जाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर येऊ शकते. याचाच विचार करून परीक्षेबाबत तत्काळ निर्णय घेऊन द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.
अभाविपच्या प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी (दि.१८) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांना निवेदन दिले. यावेळी अभाविपचे जिल्हा
संयोजक दुर्गेश केंगे, प्रसाद जोशी , सागर जंजाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.