इंजिनियरिंग, फार्मसी पदविका प्रवेशाला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:17+5:302021-01-10T04:12:17+5:30
नाशिक : अभियांत्रिक व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासह विविध पदविका अभ्यासक्रमांच्या महाविद्यालय स्तरावरील प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून त्यामुळे यापूर्वी ...
नाशिक : अभियांत्रिक व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासह विविध पदविका अभ्यासक्रमांच्या महाविद्यालय स्तरावरील प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून त्यामुळे यापूर्वी शुक्रवारी (दि. ८) जाहीर होणारा कटऑफचा तपशील आता १५ जानेवारीला जाहीर केला जाणार आहे. तर महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांचा तपशील संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठीही देण्यात आलेली शनिवार (दि. ९) पर्यंतची मुदत १६ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाची माहिती नाशिक विभागीय कार्यालयाने दिली आहे.
दहावीनंतर पूर्ण वेळ तीन वर्षांच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी, बारावीनंतर पूर्णवेळ औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम व थेट द्वितीय वर्षाचा पूर्णवेळ अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथ वर्ष प्रवेश प्रक्रियेचा अंतिम मुदत ८ जानेवारी होती ही मुदत आता वाढविण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १५ जानेवारीपर्यंत प्रवेश महाविद्यालयस्तरावर प्रवेश निश्चित करता येणार असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सर्व प्रकारच्या पदविका प्रवेशाचा कटऑफ १५ जानेवारीला जाहीर होणार आहे. तर महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा तपशील संबंधित महाविद्यालयांना डीटीईच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.