अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:34 AM2018-02-03T00:34:46+5:302018-02-03T00:35:34+5:30
नाशिक : पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मूळच्या मालेगाव येथील तरुणाने नाशिकमधील मित्रांच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास सातपूरच्या सावरकरनगरमध्ये घडली़ भरत तानाजी ठोंबरे (२४, रा. मोरदर टिपे, ता. मालेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत ठोंबरे हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता़ पुणे येथे जाण्यापूर्वी सातपूर सावरकरनगरमधील मौले हॉलनजीक असलेल्या सोमेश्वर संकुलमध्ये राहणाºया मालेगावच्या मित्रांकडे आला होता़ मालेगाव तालुक्यातील एकाच रूममध्ये राहणारे त्याचे मित्र हे शुक्रवारी सकाळी आपापल्या महाविद्यालयात गेले होते़ दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास महाविद्यालयातून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ भरतने रूमच्या खिडकीस नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता़ मयूर ठाकरे या मित्राने त्यास प्रथम जवळील खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़. भरत काही दिवसांपूर्वीच मालेगावी आपल्या घरी गेला होता़ पुण्याला जाण्यापूर्वी तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी सातपूर येथील त्यांच्या खोलीवर आल्यानंतर शनिवारी पुण्याला जाणार असल्याचे त्याने मित्रांना सांगितले होते़ मात्र, एक दिवस अगोदरच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या भरत याने आत्महत्येचे पाऊल का उचलले या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत़