अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 PM2021-05-23T16:09:10+5:302021-05-23T16:20:46+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील प्राथमिक निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शैक्षणिक वर्षाच्या अंतिम निकालात या गुणांचा समावेश असेल, असे स्पष्टीकरण महाविद्यालयांकडून मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकाल कधी जाहीर केला जाणार, याची प्रतीक्षा लागली आहे.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या प्रथम सत्रातील प्राथमिक निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शैक्षणिक वर्षाच्या अंतिम निकालात या गुणांचा समावेश असेल, असे स्पष्टीकरण महाविद्यालयांकडून मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकाल कधी जाहीर केला जाणार, याची प्रतीक्षा लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतल्या असून या परीक्षांंमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण प्राथमिक निकालाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. या गुणांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे अंतर्गत गुण वाढवून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.