अभियंत्यांनी कामात दक्ष असावे : राघवेंद्रा कारंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:59 AM2018-09-18T00:59:38+5:302018-09-18T01:00:32+5:30
अभियंत्यांनी आपले काम सुयोग्य व नियोजनबद्ध केले पाहिजे. काम करताना आपण लोकांचा पैसा वापरत आहोत हे लक्षात ठेवून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जे इन्फो प्रकल्प अधिकारी राघवेंद्रा कारंथ यांनी केले आहे.
नाशिक : अभियंत्यांनी आपले काम सुयोग्य व नियोजनबद्ध केले पाहिजे. काम करताना आपण लोकांचा पैसा वापरत आहोत हे लक्षात ठेवून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जे इन्फो प्रकल्प अधिकारी राघवेंद्रा कारंथ यांनी केले आहे. आर्किटेक्ट्स अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे वैराज कलादालन येथे अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. विश्वैश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुषाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राघवेंद्रा कारंथ, असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासार, खजिनदार राजेंद्र बिर्ला उपस्थित होते. अभियंत्यांनी पैशाचा सुयोग्य विनियोग करण्याचे आवाहन करतानाच ‘मेट्रोसाठी भूमिगत भुयार पोखरणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. भुयार करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी, पूर्वपरीक्षण, यंत्रसामग्री, पद्धत, काम चालू असताना घ्यावयाची काळजी, विविध परीक्षणे यासंदर्भात त्यांनी माहिती ध्वनिचित्रफितीद्वारे दिली. प्रास्ताविक योगेश कासार यांनी केले. सूत्रसंचालन कांचन गडकरी यांनी केले तर राजेंद्र बिर्ला यांनी आभार मानले. यावेळी हर्षद भामरे, सुप्रिया पाध्ये, अविनाश शिरोडे, चारुदत्त नेरकर, अनिल कठपाल, आर. के. सिंग, नेहा जाधव आदी उपस्थित होते.