काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ
By संकेत शुक्ला | Updated: January 12, 2024 16:36 IST2024-01-12T16:36:18+5:302024-01-12T16:36:49+5:30
Narendra Modi: वारकरी आणि संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह भजनात सहभाग घेत त्यांच्याशी संवादही साधला.

काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ
- संकेत शुक्ल
नाशिक - वारकरी आणि संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह भजनात सहभाग घेत त्यांच्याशी संवादही साधला.
युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनाशिक येथे आले असता त्यांनी रामकुंडावर गोदाआरती करीत प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी काळाराम मंदिरात संतपरंपरेतील एकनाथ नामदेव तुकाराम या संतांच्या वंशजांसह राज्यातील इतर वारकरी संप्रदायातील १५ प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. एकनाथ महाराजांनी मराठीत रुपांतरीत केलेल्या भावार्थ रामायणाचा पाठ यावेळी या प्रमुखांनी केला. त्या पाठाचे संपूर्ण ग्रहण करीत त्यानंतर झालेल्या राम कृष्णाच्या जयजयकारासह भजनात मोदी तल्लीन झाले होते.
यावेळी संप्रदायातील एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी, नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास, तुकाराम महाराजांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे, रामदास महाराजांचे वंशज भुषण महाराज स्वामी, प्रसाद महाराज अंमळनेरकर, महंत नामदेव शास्त्री सानप(भगवानगड), चंद्रशेखर महाराज देगलुरकर, चैतन्य महाराज देगलुरकर, महंत भास्करगिरी, महंत रामगिरी, संदिपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोर, प्रकाश महाराज जवंजाळ, संजय नाना घोंगडे उपस्थित होते. पंतप्रधान येणार म्हणून राज्यातील संतपरंपरेतील प्रमुखांना खास आमंत्रित करण्यात आले होते.
वारकरी संप्रदायाचे आशिर्वाद
वारकरी संप्रदायातील संतांच्या वंशजांसह इतर मान्यवरांचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आशिर्वाद घेतले. या वंशजांसह मोदींनी चर्चा करीत त्यांची केलेल्या भावार्थ पाठाचे त्यांनी ग्रहण केले. वारकरी संप्रदायातील संतांच्या परंपरेतील प्रमुखांशी संवाद झाल्याने मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केल्याची माहिती अध्यात्म आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिली.