एकाग्रता वाढविल्यास यश निश्चित

By admin | Published: February 23, 2017 12:19 AM2017-02-23T00:19:10+5:302017-02-23T00:19:26+5:30

शेखर जोशी : सावानाच्या वतीने विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

Enhancement of Concentration | एकाग्रता वाढविल्यास यश निश्चित

एकाग्रता वाढविल्यास यश निश्चित

Next

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक, बालभवन साने गुरुजी कथामालेतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शेखर जोशी यांनी, सांगितले की, विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढविल्यास यश मिळेल. तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवून दररोज ज्योतीध्यान करण्याचे आवाहन केले. बालभवनतर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धा, दूरदर्शन जाहिरात स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. शेखर जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी निवडक कथांचे आणि जाहिरातींचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. दूरदर्शन जाहिरात सादरीकरण स्पर्धेत तिसरी आणि चौथीच्या गटात आदित्य गौतम, भाग्यश्री पाखळे, धनश्री आहिरे, पाचवी आणि सहावीच्या गटात अथर्व जगझाप, ऋतुजा शेवाळे, अनिरुद्ध आंबेवाडीकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. चित्रकला स्पर्धेत इयत्ता तिसरी आणि चौथीच्या गटात अवनी जोशी, जान्हवी नवले, सायली केंगे, इशिता बोरसे, पाचवी आणि सहावीच्या गटात मनस्वी गोरे, ऋतुजा शेवाळे, आदित्य धनवटे तर सातवी आणि आठवीच्या गटात सृष्टी नेरकर, सृष्टी व्होरा, पूर्वा जाधव, सफा शेख यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला, तसेच मराठी स्वाक्षरी स्पर्धेत पारस भदाणे, भाग्यश्री पाखळे, अनिरुद्ध आंबेवाडीकर, ऋतुजा शेवाळे, ऋचा झेंडे, सफा शेख, वृषाली बोरा यांना पारितोषिके मिळाली. प्रास्ताविक बालभवन प्रमुख गिरीश नातू यांनी केले. तर आभार डॉ. आशा कुलकर्णी यांनी मानले. यावेळी अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे, प्रकाश वैद्य आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Enhancement of Concentration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.