"ते" गवऱ्यांमध्ये शोधतायत होळीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 03:03 PM2018-02-28T15:03:42+5:302018-02-28T15:03:42+5:30

होळीचा सण देशभर विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे आदिवासी व दुर्गम भागातील कष्टकऱ्यांची मात्र वेगळीच धावपळ दिसून येते.

Enjoy the Holi finding "they" in the cows | "ते" गवऱ्यांमध्ये शोधतायत होळीचा आनंद

"ते" गवऱ्यांमध्ये शोधतायत होळीचा आनंद

googlenewsNext

- रामदास शिंदे
पेठ- होळीचा सण देशभर विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे आदिवासी व दुर्गम भागातील कष्टकऱ्यांची मात्र वेगळीच धावपळ दिसून येते. शहरी भागात चौकाचौकात सोसायट्या व बंगल्यासमोर लहान लहान होळी पेटवून सण साजरा केला जातो. यासाठी लागणाऱ्या सर्व गोवऱ्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या तालुक्यांतील आदिवासी बांधव आणत असतात. वर वर दिसणाऱ्या या गोवऱ्या थापायची सुरुवात तशी दिवाळीपासून सुरू करण्यात येते. चार-पाच महिने गोवऱ्या तयार करून त्या होळीच्या एक दिवस आधी शहरात आणल्या जातात. गावाकडील होळीची यात्रा व सणावर पाणी सोडून हे आदिवासी बांधव दोन दिवस शहरातील रस्त्यावर वास्तव्य करून राहतात. तीनशे ते चारशे रुपये शेकडा गोवऱ्या विकून वर्षभराची कुटुंबाची आर्थिक गुजराण केली जाते.
 

Web Title: Enjoy the Holi finding "they" in the cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक