अनोख्या मडबाथचा लुटला अबाल वृद्धांनी आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 01:44 AM2022-04-11T01:44:48+5:302022-04-11T01:45:07+5:30
समारे २५ फुट लांबीचा चिखल भरलेला टब, भल्या पहाटे त्यात उतरलेले नागरीक, एकमेकांच्या अंगाला चिखल लावुन तासभर उन्हात बसुन पुर्ण चिखल वाळल्यानंतर शॉवरखाली मड बाथचा घेतला जाणारा आनंद असे दृष्य रविवारी सकाळी चामर लेण्याच्या पायथ्याशी येणारा अनेकांना पाहायला मिळाले . निमित्त होते तब्बल दोन वर्षानंतर रंगलेल्या मडबाथ कार्यक्रमाचे.
पंचवटी : समारे २५ फुट लांबीचा चिखल भरलेला टब, भल्या पहाटे त्यात उतरलेले नागरीक, एकमेकांच्या अंगाला चिखल लावुन तासभर उन्हात बसुन पुर्ण चिखल वाळल्यानंतर शॉवरखाली मड बाथचा घेतला जाणारा आनंद असे दृष्य रविवारी सकाळी चामर लेण्याच्या पायथ्याशी येणारा अनेकांना पाहायला मिळाले . निमित्त होते तब्बल दोन वर्षानंतर रंगलेल्या मडबाथ कार्यक्रमाचे.
म्हसरूळ शिवारातील चामरलेणीच्या पायथ्याशी नंदिनी डेअरी जवळ रविवारी (दि.१०) अनोख्या मडबाथचा कार्यक्रम रंगला. कोरोना महामारीची लाट ओसारल्यावर तब्बल दोन वर्षांनंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेकडो अबालवृद्धांनी संगीताच्या तालावर ठेका धरत मडबाथचा मनमुराद आनंद लुटला. मडबाथमध्ये न्हाऊन निघालेल्या आपल्या लोकांना ओळखणे कठीण जात होते. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी राम नवमीला मडबाथ आयोजन केले होते. मडबाथ (मातीस्नान) कार्यक्रमासाठी साधारणपणे महिन्याभरा पासून तयारी सुरू केली जाते. त्यासाठी वारुळाची माती गोळा केली जाते आठवडाभर माती भिजवली जाते शरीराच्या सर्व भागाला ही माती लावून आंघोळ करण्यामागचे मुख्य शास्त्रीय कारण म्हणजे या चिखल मिश्रित मातीमुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता निघून जाते.
रविवारी पहाटे ६ वाजेला मडबाथ कार्यक्रम सुरु झाला. सहभागी स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले. यावेळी तब्बल २५ फूट लांबीचा टब बनवून त्यात चिखल होता. टबमध्ये ३० ते ४० लोक एकाचवेळी उतरून अंगाला चिखल लावून तास भर बाहेर उन्हात चिखल वाळे पर्यंत उभे राहत होते व त्यानंतर शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते. गेल्या अनेक वर्षांपासून महेशभाई शहा, चिराग शहा नंदू देसाई कार्यक्रमाचे आयोजन करतात. मात्र कोरोना महामारीमुळे गत दोन वर्षे मडबाथला खंड पडला होता. मडबाथ उत्सवात मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागातील व स्थानिक नाशिककरांनी मडबाथचा आनंद लुटला. यावेळी अशोक कटारिया, विशाल उगले, अभय शाह, बाळासाहेब काठे, भगवान काळे, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, नितीन रौंदळ, वैभव शेटे, अमित घुगे, ज्ञानेश्वर गायकवाड, मिलिंद वाघ, प्रियदर्शन टांकसाळे, योगेश कमोद, विजय पाटील, मनोज देसाई, गौरव देसाई, जयेश देसाई आदींसह नाशिक सायकलिस्ट,जॉगर्स ग्रूप, जल्लोष ग्रूप, पंचवटी व्यापारी ग्रूप, नाशिक इको ड्राईव्ह, चामारलेणी ग्रूपचे सदस्य सहभागी झाले होते .