‘बेटी बचाव, बेटी पढाव’ विषयावर प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:05 PM2018-09-26T23:05:49+5:302018-09-27T00:13:33+5:30

‘बेटी बचाव, बेटी पढाव, सही पोषण देश रोशन’ अशा घोषणा देत बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक विभाग दोन अंतर्गत सुरू असलेल्या ‘पोषण महिना’  अंतर्गत नाशिकरोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

 Enlightenment on 'Beti Rescue, Beti Padav' | ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ विषयावर प्रबोधन

‘बेटी बचाव, बेटी पढाव’ विषयावर प्रबोधन

Next

नाशिकरोड : ‘बेटी बचाव, बेटी पढाव, सही पोषण देश रोशन’ अशा घोषणा देत बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक विभाग दोन अंतर्गत सुरू असलेल्या ‘पोषण महिना’  अंतर्गत नाशिकरोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.  मुख्य प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य पर्यवेक्षक विद्या गायकवाड, अंगणवाडी सेविका भारती पवार, अश्विनी कदम, लक्ष्मी ढेंगळे, ज्योती पाटील यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचे प्रबोधन करीत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात माता आपल्या नवजात शिशुला योग्य आहार देत असल्याचे सांगितले.  आपल्या अपत्यास ठराविक काळापर्यंत मातेचे दूध देणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोचर किशोरवयीन मुली व महिला यांनी लग्नानंतर वैद्यकीय मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. मुलींचे संगोपन व बचाव करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा राऊत, महिला पोलीस ज्योती काजळे, स्नेहल सोनवणे, पूनम थोरात, शीतल जोंधळे, रेणुका भोर, निकिता शिंदे, अनिता लिमये उपस्थित होते.

Web Title:  Enlightenment on 'Beti Rescue, Beti Padav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.