अन्न-औषध विभागाकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:11 AM2017-11-04T01:11:44+5:302017-11-04T01:12:20+5:30

अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली.

Enlightenment by Department of Food and Drugs | अन्न-औषध विभागाकडून प्रबोधन

अन्न-औषध विभागाकडून प्रबोधन

Next

नाशिक : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी सहआयुक्त यू. एस. वंजारी होते.
हॉटेल एमराल्ड पार्क येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, श्रीधर शेट्टी, शिवाजी जाधव, तेज टकले उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीनुरूप तयार करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राहकांचे हित जोपसण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांचा संपर्क हा सर्व घटकातील आणि सर्व वयोगटातील लोकांशी येत असल्याने त्यांनी अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे. अन्नाची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्यावर असली पाहिजे, असेदेखील यावेळी अन्न विभागातील अधिकाºयांनी सांगितले.
याप्रसंगी सहायक आयुक्त सी. डी. राठोड यांनी सांगितले की अन्नसुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब असून याचा थेट संबंध नागरिकांच्या जीवनाशी येत असल्याने याबाबत सर्वांनी कायमच काळजी घेणे आवश्यक ठरते. तर अन्नसुरक्षा तेरकर यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसायिकांनी ग्राहकांना कोणतेही पदार्थ पुरवितांना नियमाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे. अन्नपदार्थातून कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात यावी. दरम्यान, अशाप्रकरच्या कार्यशाळा नियमित घेण्याची मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली. नाशिक जिल्ह्यात भगर, तांदूळ व मिठाई उत्पादक यांच्यासाठी तीन कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. तसेच सुरक्षित प्रसाद वाटपासंदर्भात देवस्थान प्रशासनाचीदेखील बैठक घेण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्नसुरक्षा अधिकारी बाविस्कर, इंगळे, सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी आभार मानले. तर श्रीमती पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Enlightenment by Department of Food and Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.