साध्या जीवन शैलीने पर्यावरणाचे होईल संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 02:08 PM2019-06-06T14:08:59+5:302019-06-06T14:17:38+5:30

जगातील जवळपास शंभर पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि    संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.

Enrichment of the environment by simple lifestyle | साध्या जीवन शैलीने पर्यावरणाचे होईल संवर्धन

साध्या जीवन शैलीने पर्यावरणाचे होईल संवर्धन

Next
ठळक मुद्देपर्यावरण दिन औचित्य, संवर्धन कायमच करावेसाध्या दैनदिन कामात काळजी घेऊन टाळता येईल प्रदुषण

जागतिक पर्यावरण दिवस- २००९ या वर्षाची संकल्पना ही बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयीची आहे. त्याचा विचार केला तर जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करु न वाढते कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी होऊन आॅक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणा-या क्लोरे-फ्लुरो कार्बन वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करु न त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुराड्यातून तसेच वाहनांमधून होणा-या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करता येऊ शकतात.

नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्र म राबविल्यास आपण ख-या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु , यात शंका नाही.

पर्यावरण हा विषय कधीच संपत नसतो. त्यामुळे त्यावर सातत्याने काम करणे आवश्यक आहे. आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरु नच सुरु वात करु या. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणा-या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरआॅईल अशांची पुनर्निर्मिती करता येईल. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय केले पाहिजे. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणाºया कागदी पिशव्या वापरल्या पाहिजेत. अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवता येईल. पाण्याचा गैरवापर करणे थांबवा. घरातील रु म हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळा, गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवा, घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणा-या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवू या आणि या  माध्यमातूनच जनजागृती करता येईल.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करु न चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण उपक्र म राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो आणि अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु शकतो.


- सोनम रोकडे मोरे, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Enrichment of the environment by simple lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.