पाच रुपये भरा तरच बाजारात प्रवेश; खरेदीसाठी केवळ एकच तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:57 PM2021-03-29T17:57:56+5:302021-03-29T18:04:39+5:30

नाशिक : बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करुन देण्याचा अफलातून प्रयोग ...

Enter the market only if you pay five rupees; Only one hour for shopping | पाच रुपये भरा तरच बाजारात प्रवेश; खरेदीसाठी केवळ एकच तास

पाच रुपये भरा तरच बाजारात प्रवेश; खरेदीसाठी केवळ एकच तास

googlenewsNext
ठळक मुद्देअनावश्यक गर्दीवर नियंत्रण मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये नियम

नाशिक :बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करुन देण्याचा अफलातून प्रयोग शहरातील मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये सोमवारी (दि.२९) पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली. दुपारनंरत मेनरोड, शिवाजीरोड येथील मुख्य बाजारपेठेकडे जाणारे महत्वाचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंद केले. या भागात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला पाच रुपयांची पावती मनपा कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती.

शहर व परिसरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने विविधप्रकारचे निर्बंध जारी केले आहे; मात्र नागरिकांकडून बाजारपेठांमध्ये नियमांचे उल्लंघन होतच असल्याने पोलीस व मनपा प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदीसाठी वेळमर्यादा अन‌् प्रवेश शुल्क वसुलीची मात्रा शोधून काढली आहे. शहरात शिवाजीरोड, मेनरोड, गाडगेमहाराज पुतळा ते सरस्वती चौकापर्यंत (बादशाही कॉर्नर) खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी उसळते. दिवसभर या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून येते.

यामुळे या गर्दीवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी या बाजारपेठेकडे येणारे प्रमुख रस्ते पोलिसांनी सोमवारी बॅरिकेड टाकून बंद केले. बादशाही कॉर्नर, नवापुरा गल्ली, धुमाळ पाइँट, सेंट थॉमस चर्च कॉर्नर, वावरे गल्ली, या ठिकाणांहून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रत्येक पॉइंटवर मनपा कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीही दोन सत्रांत बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून राज्य पोलीस कायदा कलम-४३अनुसार गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अशाप्रकारचा प्रयोग शहरात राबविला जात असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अशाप्रकारे प्रयोग बाजारपेठांमध्ये राबविण्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच वेळ असल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Enter the market only if you pay five rupees; Only one hour for shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.