लसीकरणासाठी पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:34 AM2018-11-02T00:34:01+5:302018-11-02T00:35:19+5:30

नाशिक : गोवर रुबेला या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला जात आहे.

Enter the squad for vaccination | लसीकरणासाठी पथक दाखल

लसीकरणासाठी पथक दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद : मोहिमेची पूर्वतयारी; कामकाजाचा घेतला आढावा

नाशिक : गोवर रुबेला या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला जात आहे.
नाशिक जिल्ह्णात गोवर लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरीक्षक त्रिपाठी आणि विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सूचनाही केल्या.
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात ‘गोवर रुबेला लसीकरण मोहीम २०१८’ नोव्हेंबरपासून पुढील पाच आठवडे जिल्ह्णात तसेच महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे. यासाठीची पूर्वतयारी जाणून घेण्यासाठी केंद्राचे पथक नाशिकला आले आहे. पथकाने शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण या विभागांनी आजपर्यंत केलेल्या कामांविषयी जिल्हास्तरावर भेट देऊन माहिती घेतली. यामध्ये जिल्हास्तरावरील टास्क फोर्स मीटिंग, अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यशाळा आणि सूक्ष्म कृती आराखड्याबाबत माहिती घेतली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंप्री व ओझर येथे जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा पूर्वतयारी सूक्ष्म कृती आराखडा, लस साठवणूक या विभागांची पूर्वतयारीच्या दृष्टीने तपासणी केली तसेच शाळांमध्ये जाऊन पालक सभा, शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत की नाहीत याबाबत माहिती घेतली, तसेच उपस्थिताना मार्गदर्शन केले.
त्रिपाठी यांच्या समवेत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये, शिक्षण विभागाच्या श्रीमती देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Enter the squad for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.