गावात प्रवेश करताय? मग वेशीवरच धुवा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:14 PM2020-03-24T17:14:17+5:302020-03-24T17:14:39+5:30
पेठ : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील जनतेनेही कोरोना रोगाचा धसका घेतला असून, गावागावांत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील ...
पेठ : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील जनतेनेही कोरोना रोगाचा धसका घेतला असून, गावागावांत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील ससुणे या गावातील लोकांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी चक्क गावाच्या वेशीवरच हातपाय धुण्याची सुविधा केली असून कोणत्याही प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.
ससुणे या गावात प्रवेश करताच एक मोठा फलक लावण्यात आला असून, त्यासोबत गावकीच्या पातेल्यात पाणी व साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकास गावकुसावर स्वच्छ हात पाय धुऊनच प्रवेश दिला जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा कोरोनाबाबत किती जागरूक आहेत हे यावरून दिसून येत आहे. गावांतील सार्वजनिक ठिकाणी फलकावर कोरोनापासून बचाव करणाऱ्या सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. गाव स्तरावर शासकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांना गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, गावात बाहेरून येणाºया नागरिकांवर नजर ठेवण्यात येत आहे.