अभोणा विद्यालयात उद्यम नोंदणी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:31+5:302021-09-27T04:15:31+5:30

वाढविला आहे.मात्र, मार्केंटिंग क्षेत्रात कमी पडत असल्याने त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यासाठी महिलांनी ऑनलाइन व्यवसायाकडे वळावे, असे ...

Enterprise Registration Workshop at Abhona Vidyalaya | अभोणा विद्यालयात उद्यम नोंदणी कार्यशाळा

अभोणा विद्यालयात उद्यम नोंदणी कार्यशाळा

googlenewsNext

वाढविला आहे.मात्र, मार्केंटिंग क्षेत्रात कमी पडत असल्याने त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यासाठी महिलांनी ऑनलाइन व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन जनशिक्षण संस्थानच्या संचालिका ज्योती

लांडगे यांनी केले. येथील जनता विद्यालयात जनशिक्षण संस्थान, हक्क दर्शन संस्था व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित उद्यम नोंदणी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत हक्क दर्शन संस्थेचे समन्वयक जितेंद्र वाटेकर, सागर नाईक, लीला सोनवणे यांनी उद्यम नोंदणी ही भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाची योजना असून, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती दिली. तर कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत व्यवसायांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेत व्यवसाय वाढविण्यास मदत होते. उद्योजक महिलांनी याची माहिती करून घ्यावी, असे आवाहन हेमलता बिडकर यांनी केले.

यावेळी उद्यम, पॅनकार्ड व शॉप ॲक्टसाठी ६५ महिलांची नोंदणी करण्यात आली. सोनल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली टेलरिंग प्रशिक्षणात तयार करण्यात आलेल्या विविध ड्रेसच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते

उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्या कल्पना शिरोरे, सरपंच सुनीता पवार, उपसरपंच भाग्यश्री बिरार, दीपाली वाघुले, राजनंदिनी, नरहर जाधव, अल्पेश शहा, कमलेश शेलार, शांताराम बागुल, अजय वाघ व परिसरातील महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. किरण सूर्यवंशी यांनी, तर पर्यवेक्षिका सुनंदा थोरात यांनी आभार प्रदर्शन केले.

फोटो - २६ अभोणा १

अभोणा येथे महिला उद्यम नोंदणी कार्यशाळा आयोजनप्रसंगी ज्योती लांडगे, हेमलता बिडकर, सुनीता पवार, भाग्यश्री बिरारी, सोनल शहा आदी.

260921\26nsk_26_26092021_13.jpg

अभोणा येथे महिला उद्यम नोंदणी कार्यशाळा आयोजनप्रसंगी ज्योती लांडगे, हेमलता बिडकर, सुनिता पवार, भाग्यश्री बिरारी, सोनल शहा आदी.

Web Title: Enterprise Registration Workshop at Abhona Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.