देवळ्यात लसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:28+5:302021-06-27T04:11:28+5:30
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्वत्र लसीकरणाची मागणी वाढू लागली होती. सुरुवातीला लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांमुळे लसीकरण केंद्रावर फारशी ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्वत्र लसीकरणाची मागणी वाढू लागली होती. सुरुवातीला लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांमुळे लसीकरण केंद्रावर फारशी गर्दी दिसत नव्हती. परंतु, आरोग्य विभाग, महसूल यंत्रणेने लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनतेमध्ये केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम झाला व सर्वत्र लसीकरणाची मागणी वाढू लागली; परंतु लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण न करताच परत जावे लागत होते. तालुक्यासाठी येणारा लसींचा अत्यल्प साठा खूपच अपुरा पडत होता. यामुळे सर्वत्र रोष वाढत होता. अखेर शनिवारी तालुक्यासाठी ३७०० लसींचा पुरवठा करण्यात आल्यानंतर देवळा, भउर, महाल पाटणे, रामेश्वर, मेशी, खुंटेवाडी, वाजगाव, लोहोणेर, आदी १४ केंद्रांवर लसींचे वाटप करण्यात येऊन लसीकरण करण्यात आले. यावेळी १८ वर्षांपुढील सर्वांनाच लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी रांगा लागल्या होत्या.
-------------------------------
फोटो - भऊर येथे लसीकरण केंद्रासमोर लसीकरणासाठी लागलेल्या रांगा. (२७ देवळा १)
===Photopath===
260621\26nsk_29_26062021_13.jpg
===Caption===
२७ देवळा लसीकरण