लायन्स क्लब स्मार्ट सिटीचे पदग्रहण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:20 AM2018-08-03T01:20:28+5:302018-08-03T01:21:20+5:30
नाशिक : जिल्ह्णातील आदिवासी, अतिदुर्गम पाड्यांवर कुपोषणाने होणारे बालमृत्यू असो की तेथील पिण्याचे पाणी, आरोग्य आणि साक्षरता या विषयावर लक्ष केंद्रित करून अशी गावे दत्तक घेऊन त्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचा संकल्प लायन्स क्लब आॅफ नाशिक स्मार्ट सिटीच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभात करण्यात आला.

याप्रसंगी क्लबच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा स्मार्ट सिटीझन अॅवॉर्ड हा मनमाड येथील गावातील ज्येष्ठ नागरिक व अल्पावधीतच पाणी आडवा, पाणी जिरवा अभियान राबविणाऱ्या शिवाजी मार्कंड व आंतरराष्ट्रीय धावपटू ताई बामणे यांना गौरविण्यात आले. शपथग्रहण समारंभ माजी प्रांतपाल द्वारकाजी जालन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नूतन अध्यक्ष लायन भरत सिंघल यांनी पदभार स्वीकारला.