नाशिकरोड परिसरातही उत्साह

By admin | Published: January 23, 2015 11:58 PM2015-01-23T23:58:57+5:302015-01-23T23:59:07+5:30

गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक

Enthusiasm in the Nashik Road area | नाशिकरोड परिसरातही उत्साह

नाशिकरोड परिसरातही उत्साह

Next

नाशिकरोड : देवळालीगाव सार्वजनिक पार श्री सूर्यमुखी गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.
श्री गणेश जयंतीनिमित्त देवळालीगाव सार्वजनिक पार श्री सूर्यमुखी गणेश मंदिरात आज पहाटे सनई वादन, मांडव डहाळे आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी १० वाजता देवी चौक, दंडे अलंकार येथून प्रथेप्रमाणे गणेश पालखी मिरवणूक शिवाजी पुतळा, बिटको पॉर्इंट, मुक्तिधाममार्गे देवळालीगावापर्यंत काढण्यात आली होती. पालखी मिरवणुकीत एका चित्ररथावर देवदेवतांच्या वेशभूषा केलेले भाविक सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
दुपारी गणेश याग व सायंकाळी शिवा शाहीर कल्याणजी काळे पाटील यांचा कीर्तन व शाहिरीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, राजू लवटे, रामभाऊ जगताप, सुधाकर जाधव, शिरीष लवटे, श्याम खोले, नितीन चिडे, कृष्णा लवटे, सोमनाथ मोरे, प्रिन्सी लांबा, मनोहर कोरडे, चंदू महानुभाव, प्रमोद बुवा, राजेंद्र जाचक, मदन पाळदे, गंगाराम पवार आदि उपस्थित होते. आभार नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी मानले.
विहितगाव येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम येथे चतुर्मुख भव्य गणरायाच्या मूर्तीची अण्णा महाराज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. जेलरोड मॉडेल कॉलनी गणपती मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती पालखी मिरवणुकीने झाली. यावेळी महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जेलरोड पिंटो कॉलनी चंद्रेश्वरनगर येथील गणपती मंदिरामध्येदेखील विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. (प्रतिनिधी)

Web Title: Enthusiasm in the Nashik Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.