शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:35+5:302021-02-20T04:38:35+5:30
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण चौकाचौकात भगवे ध्वज, पताका, मंडप यामुळे शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला अवघे नाशिक ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण चौकाचौकात भगवे ध्वज, पताका, मंडप यामुळे शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला अवघे नाशिक शहर भगवामय झाले असून शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. शिवभक्तांनी गेल्या महिनाभरापासून विविध मंडळांनी शिवजन्मोत्सव सोहळ्याची आणि मिरवणुकीची तयारी केली आहे. मात्र राज्य शासनाने ऐनवळी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजन्मोत्सव साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना केल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्बंधांमुळे शहरातील वाकडी बारव येथून निघणाऱ्या मिरवणुकीविषयीही संधिग्धता निर्माण झाली आहे. मात्र शिवभक्तांचा उत्साह कणभरही कमी झालेला नाही. त्यामुळे यावर्षीही शिवजयंती सोहळा जल्लोषाताच साजरा होणार आहे. शहरातील विविध मंडळांनी गुुरुवारीच चारचाकी व दुचाकीच्या रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित असल्याचे नमूद करतानाच कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली असतानाही संपूर्ण शहरातील विविध रस्त्यांवर भगव्या पताका ध्वज लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चौकाचौकात व्यासपीठ उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन तयारी केली. दरम्यान, काही शिवभक्तांनी मिरवणुकीची तयारी केली असली तरी काही मंडळांनी परंपरेनुसार शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा विचार केला आहे.
इन्फो -
संभाजी ब्रिगेडतर्फे मशाल रॅली
संभाजी ब्रिगेडतर्फे जागतिक शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रबोधनात्मक व्याख्यान व मशाल रॅली चे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे यावर्षीही शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री ११.३० .वाजता नाशिक महानगरपालिका मेन रोड येथून संभाजी ब्रिगेडतर्फे मशाल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समारोप करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रीगेडतर्फे स्पष्ट करण्यात आले.
इन्फो-
पावसाचे विरजण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले असले तरी सायंकाळी झालेल्या पावसामुळे गोंधळ उडाला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात पावसाच्या सरी कोसळ्याने विविध कार्यक्रमांवर पावसाचे विरजण पडले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तसेच सजावटी देखील झाकून ठेवाव्य लागल्या.
===Photopath===
180221\18nsk_31_18022021_13.jpg
===Caption===
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातून चारचाकी वाहनांतून रॅलीत सहभागी झालेले शिवप्रेमी तरुण