त्र्यंबकेश्वरला जैन साधकांचा प्रवेश सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 06:27 PM2019-05-04T18:27:32+5:302019-05-04T18:27:55+5:30
भगवान महावीर यांच्या तत्त्वाला अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य आत्मज्ञानी, ध्यानयोगी व युगप्रधान पूज्य डॉ. शिवमुनीजी महाराज, महेंद्र ऋषीजी महाराज, प्रकाशमुनीजी महाराज आदींसह जैन साधक साध्वी यांचा शनिवारी येथे प्रवेश सोहळा पार पडला. रविवारी (दि. ५) ठिकठिकाणी ६० ते ७० जैन साधू साध्वी यांच्या उपस्थितीत नाशिक येथील सरस्वती विद्या केंद्र येथे अक्षय्य तृतीया वर्षातप पारणा महोत्सव येथे होणार आहे.
त्र्यंबकेश्वर : भगवान महावीर यांच्या तत्त्वाला अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य आत्मज्ञानी, ध्यानयोगी व युगप्रधान पूज्य डॉ. शिवमुनीजी महाराज, महेंद्र ऋषीजी महाराज, प्रकाशमुनीजी महाराज आदींसह जैन साधक साध्वी यांचा शनिवारी येथे प्रवेश सोहळा पार पडला. रविवारी (दि. ५) ठिकठिकाणी ६० ते ७० जैन साधू साध्वी यांच्या उपस्थितीत नाशिक येथील सरस्वती विद्या केंद्र येथे अक्षय्य तृतीया वर्षातप पारणा महोत्सव येथे होणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश सोहळा होऊन शुक्र वारी (दि. १०) रोजी सांगता समारोह होईल. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर, विल्होळी, रविवार कारंजा, सरस्वती विद्या केंद्र, नाशिक नगरीत आगमन होईल. या सर्व ठिकाणी भरगच्च कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित मान्यवरांसह जैन साधू, साध्वी आदींनी मनोगत व्यक्त केले. जैन साधूंनी मार्गदर्शन केले. यावेळी त्र्यंबक-इगतपुरीचे प्रांताधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. त्यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. मंगळवारी (दि.७) रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर भारतातील जैन समाजातील साधारण ४०० साधकांच्या उपस्थितीत भारतातून आलेले जैन बांधव वर्षातपाची सांगता (पारणा) करण्यासाठी येणार आहेत. पूज्य शिवमुनीजी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सांगता होणार आहे. (०४ टीबीके जैन)