विधी अभ्यासक्रमासाठी २१ एप्रिलला प्रवेश परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:48 AM2019-02-12T00:48:22+5:302019-02-12T00:49:28+5:30
विधी शाखेच्या एलएलबी या तीन वर्षीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व बीए एलएलबी या पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेचे (एमएच-सीईटी) वेळापत्रक जाहीर झाले आहे.
नाशिक : विधी शाखेच्या एलएलबी या तीन वर्षीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व बीए एलएलबी या पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेचे (एमएच-सीईटी) वेळापत्रक जाहीर झाले आहे.
बीए एलएलबी या पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २१ एप्रिलला प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी ११ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तर पदव्युत्तर एलएलबी या तीन वर्षीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ११ मे रोजी होणार असून, त्यासाठी आॅनलाइन अर्ज भरावयाच्या
तारखा लवकरच जाहीर होणार
आहेत.
आॅनलाइन अर्ज भरताना काही अडचणी येत असतील किंवा प्रवेश परीक्षेचे स्वरूप, प्रवेश परीक्षेनंतरची कार्यप्रणाली कशी असते याशिवाय सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
सीईटी अनिवार्य
विधी शाखेच्या एलएलबी या तीन वर्षीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व बीए एलएलबी या पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची घेतली जाणारी प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नाही. विधी शाखेला प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याचे आवाहन मविप्रच्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कामासाई व उपप्राचार्य चारुशिला खैरनार यांनी
केले आहे.