उद्योजक लीलाधर पाटील यांचे लंडन येथे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 01:51 PM2021-03-29T13:51:33+5:302021-03-29T13:55:41+5:30

नाशिक : येथील मूळ रहिवासी व इंग्लंडस्थित उद्योगपती, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लीलाधर मुरलीधर पाटील (७५)यांचे इंग्लंड येथील वर्कशॉप या सिटीत राहत्या घरी सोमवारी(दि.२९) निधन झाले.

Entrepreneur Liladhar Patil dies in London | उद्योजक लीलाधर पाटील यांचे लंडन येथे निधन

उद्योजक लीलाधर पाटील यांचे लंडन येथे निधन

Next
ठळक मुद्देकुसुमाग्रजांशी होता निकटचा संबंधअनेक संस्थांना आर्थिक मदत

नाशिक : येथील मूळ रहिवासी व इंग्लंडस्थित उद्योगपती, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लीलाधर मुरलीधर पाटील (७५)यांचे इंग्लंड येथील वर्कशॉप या सिटीत राहत्या घरी सोमवारी(दि.२९) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी  शालिनी पाटील, मुलगा अमोल व अमित, मुलगी मंगला तसेच सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

लीलाधर पाटील यांची इंग्लंडमध्ये मेंटली हॅंडीकॅप सीनियर सिटीजन साठी दोन नर्सिंग होम आहेत. उद्योजक कै.सुधाकर पाटील यांचे ते लहान बंधू होत. लीलाधर पाटील यांचा नाशिकमध्येही हॉटेल व्यवसाय आहे. नाशिकच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. लोकहितवादी मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानशीही ते निगडीत होते. तात्यासाहेब शिरवाडकर हे इंग्लंडला गेले असता त्यांचा मुक्काम लीलाधर पाटील यांच्या घरीच होता. तात्यासाहेबांना शिरवाडकर यांना लंडनची सैर घरविण्यासाठी खास त्यांनी अलिशान मोटार देखील खरेदी केली होती.त्यांची एक कन्या आर्मीत कर्नल पदावर आहे. पाटील हे नाशिकमधील अनेक संस्थांशी निगडीत होते तसेच त्यांनी अनेक संस्थांना आर्थिक मदत देखील केली हेाती. 

Web Title: Entrepreneur Liladhar Patil dies in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.