उद्योजकाला साठ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:36 PM2019-06-02T23:36:08+5:302019-06-03T00:08:01+5:30

अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड विकत घेऊन देतो, असे सांगत उद्योजकाची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंत्रालयात दलाली करणाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The entrepreneur loses 60 lakhs | उद्योजकाला साठ लाखांचा गंडा

उद्योजकाला साठ लाखांचा गंडा

Next

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड विकत घेऊन देतो, असे सांगत उद्योजकाची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंत्रालयात दलाली करणाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, खुटवडनगर भागातील उद्योजक राजेंद्र बोरसे यांचे अंबड औद्योगिक वसाहतीत युनिट आहे. कामकाज करताना या जागेत अडचणी येत असल्याने बोरसे यांनी याच भागात भूखंड विकत घेण्याची तयारी केली. एमआयडीसीत भूखंड विकत घेण्यासाठी माहिती घेत असताना बोरसे यांची मंत्रालयात दलालीचे काम करणाºया रमेश कुलकर्णी (अहमदनगर) यांच्याशी ओळख झाली. संशयित कुलकर्णी यांनी काही लोकांकडून पैसे घेत कामे केल्याने बोरसे यांनीदेखील त्यांच्यावर विश्वास ठेवला.
यानंतर संशयित कुलकर्णी यांना एमआयडीसी परिसरात दोन हजार चौरस मीटरचा प्लॉट असल्याचे बोरसे यांना सांगितले. यासाठी बोरसे यांनी टप्प्याटप्प्याने कुलकर्णी यास सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या दरम्यान तीन वर्षांत रोख रक्कम तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून सुमारे साठ लाख रुपये दिले. तीन वर्ष होऊनही भूखंड मिळत नसल्याने बोरसे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर शनिवारी (दि.१) उद्योजक राजेंद्र बोरसे यांनी रमेश कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा तक्रार दिली आहे.
‘पेटीएम’द्वारे ३७ हजारांची फसवणूक
इंदिरानगर परिसरातील एका रहिवाशाने ओएलएक्सवर विक्रीसाठी ब्रेसलेट ठेवले होते. एका भामट्याने मोबाइलवरून ब्रेसलेट खरेदीचा बहाणा करत ग्राहक असल्याचे भासवून फोन पे व पेटीएम या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करत ३७ हजार ९४८ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भामट्याने बनावट ग्राहक बनून दोन मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी हेमंत उमाकांत उदावंत (४६, रा. श्रीजी संकुल) यांनी ओएलएक्स या वेबसाईटवर एक ब्रेसलेट विक्रीसाठी अपलोड केले होते. या ब्रेसलेटची खरेदी करण्याचे कारण दाखवून उदावंत यांच्याशी संपर्क साधत फोन-पे, पेटीएमच्या माध्यमातून ३७ हजार ९४८ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The entrepreneur loses 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.