‘रत्न-सिंधू’तर्फे उद्योजक कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:03 AM2018-07-01T01:03:07+5:302018-07-01T01:03:32+5:30
रत्न-सिंधू मित्रमंडळाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात युवकांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व शिबिर घेण्यात आले.
नाशिक : रत्न-सिंधू मित्रमंडळाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात युवकांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात रंजन चव्हाण यांनी बॅँकिंग व टॅक्स विषयावर मार्गदर्शन केले. तर स्किल कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक महेश चाळके यांनी काबील बनो, कामयाब बनो या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे विश्लेषण जिल्हा समन्वयक पल्लवी मोरे यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने उद्योजकता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उद्योग उपसंचालक उमेश दंडगव्हाळ यांनी दिली. डॉ. नम्रता देशमुख यांनीही ताणतणाव कमी करण्यासाठी कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले. सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष परशुराम कानकेकर, महेश चाळके, रंजन चव्हाण, धोंडीबा वेंगुर्लेकर, संजय साटलकर, मंगो पालव, विष्णू पवार, वासुदेव वालावलकर, अजय धाग, नितीन सावंतल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.