पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:57 PM2019-04-14T18:57:11+5:302019-04-14T18:57:46+5:30

सिन्नर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत गेल्या एक ते दिड महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दारणा नदीपात्रात लवकर आवर्तन सोडून चेहडी बंधारा भरुन द्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय निमा व स्टाईसच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

 Entrepreneurs meeting on the backdrop of the scarcity of water | पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांची बैठक

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांची बैठक

Next

चेहेडी बंधाºयात पाणी उपलब्ध नसल्यामुळे वसाहतींवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले असल्याने निमा मार्फत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दुष्यंत उईके यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, अतिरिक्त चिटणीस संदीप भदाणे, पायाभूत उपसमितीचे अध्यक्ष किरण वाजे, उर्जा उपसमितीचे अध्यक्ष बबन वाजे, निमा हाऊस उपसमितीचे अध्यक्ष राहुल नवले, तक्रार निवारण उपसमितीचे अध्यक्ष अतुल अग्रवाल, अजय बहेती, अरूण चव्हाणके, दत्तात्रय ढोबळे, स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे उपअभियंता जे. सी. बोरसे उपस्थित होते. सिन्नर औद्योगिक क्षेत्रात दोन औद्योगिक वसाहत असून माळेगांव औद्योगिक वसाहतीत ९०० ते १ हजार व मुसळगांव औद्योगिक वसाहतीत ३७० उद्योग सुरू आहेत. या दोन्ही वसाहतींमध्ये अनेक मल्टीनॅशनल उद्योगांसोबतच मध्यम व लहान उद्योग असल्याने जवळपास ५० ते ५५ हजारापेक्षा जास्त कामगार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काम करत आहे. सिन्नर सारख्या दुष्काळग्रस्त परिसरातील अनेक कुटुबांना खºया अर्थाने रोजगार मिळवून देण्याचा मोलाचा वाटा या वसाहतींचा असून, राज्य व केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसुल मिळवून देण्याचे महत्वपुर्ण काम करत आहे. वसाहतीत सद्यपरिस्थितीत झोन नुसार पाणी पुरवठा करण्यात येत असून त्यातही सातत्यता नसल्यामुळे पुढील काळात उद्योग कशा पध्दतीने सुरू ठेवायचा हा मोठा प्रश्न प्रत्येक उद्योजकांसमोर निर्माण झालेला आहे. अनेक कंपन्यांना उत्पादन चालू ठेवण्यासाठी व कामगारांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे कंपन्यांना मोठया प्रमाणात आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागत आहे. तीव्र पाणी टंचाईची असलेली दाहकता पाहता वसाहतीतील अनेक कंपन्या मुबलक पाणी पुरवठ्या अभावी बंद ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने भविष्यात त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्राबरोबरच इतर अनेक घटकांवर होण्याची शक्यता असल्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी योगेश मोरे, आर. एन. अवस्थी, संतोश भामरे, शांताराम दांरूंटे, सुनील राजगुरू, कृष्ण नाईकवाडे, एस.आर. अष्टूरे, जयंत काळे, देवीप्रसाद पत्रा, सुरेश जोंधळे, परेश पवार, यतीन ठोंबरे आदींसह उद्योजक उपस्थित होते.

Web Title:  Entrepreneurs meeting on the backdrop of the scarcity of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.