माळेगाव औद्योगिक वसाहतीत उद्योजकांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:43 PM2020-07-25T15:43:49+5:302020-07-25T15:46:00+5:30
सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.
सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपिठावर प्रांतधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन बच्छाव, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन पंडीत लोंढे आदी उपस्थित होते.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनलॉक नंतर नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसापासून सिन्नर तालुक्यातही कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली आहे, सिन्नर तालुक्यात दोन औद्योगीक वसाहती असून या दोन्ही वसाहतीत 20 ते 25000 कामगार रोजगाराच्या दृष्टीने काम करण्यात येत असतात तसेच अनेक मल्टिनॅशनल ग्रुपचे अधिकारी हे नाशिक येथून येत असतात. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता असल्याने या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी व कामगारांची सर्वाधिक सुरक्षितता घेणे महत्वाचे असल्याचे गवळी यांनी सांगितले. याच बरोबर ज्या कंपन्यांमध्ये दोन अथवा तीन शिफ्ट सुरु आहे अशा ठिकाणी कामगारांना येण्या-जाण्यासाठी किमान अर्धा तासाचा वेळ ठेवणे महत्वाचे आहे या अर्ध्या तासात कामगार ज्या ठिकाणी काम करत होते त्याठिकाणी संपूर्ण सॅनिटाईझ करूनच नवीन कामगारांना कंपनीत प्रवेश दिला पाहिजे तसेच कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगाराना सॅनिटाईझ, ऑक्सिमिटरद्वारे तपासूनच प्रवेश द्यावा अशा सुचनाही त्यांनी केल्या.
औद्योगिक क्षेत्रात महत्वाचा दुवा म्हणजे कामगार आहे तो जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कामावर देत असल्याने त्याची काळजी कंपनीने घेतली पाहिजे, ज्या कंपनीचा कामगार हा दोन ते तीन दिवसापासून गैरहजर आहे त्याची संपूर्ण हिस्ट्री घेतल्याशिवाय त्याला कामावर घेऊ नये, तसेच कंपनीत सर्वानी मास्क वापरणे महत्वाचे, कोणीही आपले मास्क इतरांशी बोलताना काढून बोलू नये, मास्क अटकून न ठेवता ते नियमित नाकाला चांगल्या प्रकारे लावणे गरजेचे असल्याचे या वेळी प्रांतधिकारी अर्चना पठारे यांनी सांगितले तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करताना जवळपास 6 फूट इतके अंतर ठेवणे महत्वाचे आहे, कोणतेही वाहन आणत असतील तर ते वाहन संपूर्ण सॅनिटाईझ करूनच पार्किंग झोनमध्ये लावावे अशा सूचनाही पठारे यांनी केल्या.
तहसीलदार राहुल कोताडे यांनी सिन्नर येथे नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयासाठी औद्योगिक वसाहतीकडून जी मदत होत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचलन अतुल अग्रवाल व आभार प्रदर्शन सुधीर बडगुजर यांनी केले. याप्रसंगी निमा हाऊस उपसमितीचे अध्यक्ष राहुल नवले, ऊर्जा उपसमितीचे अध्यक्ष बबन वाजे, सेमिनार अँड वर्कशॉप उपसमितीचे अध्यक्ष एम.जी कुलकणी, सिन्नर उपसमितीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, रेक्रेशन उपसमितीचे अध्यक्ष रतन पडवळ, स्टाईसच्या व्हा. चेअरमन सौ. मीनाक्षी दळवी, संचालक सुनील कुंदे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, दत्ता ढोबळे, बापू गावंड, सुहास काळे, राहुल शुक्ला, विशाल कुलकर्णी, सुधीर जोशी आदींसह उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते.