आॅक्सिजनबाबतच्या निर्णयास उद्योजकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:06 AM2020-09-14T01:06:46+5:302020-09-14T01:07:13+5:30

कोरोना रुग्णांना औषधोपचारासाठी आॅक्सिजनचा पुरवठा केलाच पाहिजे. परंतु उद्योगांना आॅक्सिजन अजिबात देऊ नये. या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय आणि औद्योगिक वापराचा समतोल साधावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Entrepreneurs oppose the decision on oxygen | आॅक्सिजनबाबतच्या निर्णयास उद्योजकांचा विरोध

आॅक्सिजनबाबतच्या निर्णयास उद्योजकांचा विरोध

Next
ठळक मुद्देसमतोल साधण्याची मागणी : औद्योगिक क्षेत्रात पसरली नाराजी

सातपूर : कोरोना रुग्णांना औषधोपचारासाठी आॅक्सिजनचा पुरवठा केलाच पाहिजे. परंतु उद्योगांना आॅक्सिजन अजिबात देऊ नये. या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय आणि औद्योगिक वापराचा समतोल साधावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, तर अत्यावश्यक रुग्णांना आॅक्सिजनची गरज लागते. परंतु आॅक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलून उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील आॅक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी (दि.१२) रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी आॅक्सिजन उत्पादन करणारे उत्पादक आणि पुरवठादारांनी उद्योगांना आॅक्सिजनचा पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वप्रथम रुग्णालयांना आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. वैद्यकीय कारणासाठी आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर अतिरिक्त आॅक्सिजन असल्यास जिल्हाधिकारी पुढील निर्णय घेतील. तोपर्यंत उद्योगांना आॅक्सिजनचा पुरवठा करू नये. या आदेशामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Web Title: Entrepreneurs oppose the decision on oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.