उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:05 AM2018-07-23T00:05:29+5:302018-07-23T00:06:09+5:30
भारत ही झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, तसेत भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थानही बळकट होत आहे. हे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी परदेश व्यापार धोरण राबविण्यात येत असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना, सवलती देण्यात येत आहे. त्याचा फायदा घेऊन उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आयात निर्यात समितीचे अध्यक्ष सी. एस. सिंग यांनी केले आहे.
नाशिक : भारत ही झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, तसेत भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थानही बळकट होत आहे. हे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी परदेश व्यापार धोरण राबविण्यात येत असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना, सवलती देण्यात येत आहे. त्याचा फायदा घेऊन उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आयात निर्यात समितीचे अध्यक्ष सी. एस. सिंग यांनी केले आहे.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे ‘दृष्टिक्षेपात व्यापार धोरण २०१५-२० आणि डिसेंबर २०१७ विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व मार्गदर्शक पुरुषोत्तम शाळिग्राम उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक करताना संतोष मंडलेचा यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्र म महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविले जात असून, डीजीएफटी व महाराष्ट्र चेंबर यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी चर्चासत्रे, कार्यशाळांचे आयोजन करून आयात व निर्यातीचे धोरण, त्यासाठीच्या योजना व निर्यातदारांच्या अडचणी सोडविण्याचे काम निर्यात बंधू या उपक्र मांतर्गत होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक सचिव हेमांगी दांडेकर यांनी केले.
मुंबई येथे अतिरिक्त संचालक जनरल आॅफ फॉरेन ट्रेड डॉ. सोनिया सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यात बंधू कार्यशाळा पार पडली. त्याचाच एक भाग म्हणून कार्यशाळा झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पुरु षोत्तम शाळिग्राम यांनी सांगितले की, परदेश व्यापार धोरणांतर्गत निर्यातवृद्धी प्रोत्साहन योजना आणि डिसेंबर २०१७ या मध्यवर्ती टप्प्यावरील धोरणाचा आढावाही त्यांनी घेतला.