तालुक्यात १११ शाळांमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:22 AM2019-03-10T00:22:58+5:302019-03-10T00:23:34+5:30
शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत नाशिक तालुक्यातील एकूण १११ शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून यात शहरातील ९२ तर ग्रामीण भागातील सुमारे १९ खासगी शाळांचा समावेश आहे.
नाशिक : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत नाशिक तालुक्यातील एकूण १११ शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून यात शहरातील ९२ तर ग्रामीण भागातील सुमारे १९ खासगी शाळांचा समावेश आहे. संपूर्ण नाशिक तालुक्यामध्ये एकू ण २०८१ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जागा उपलब्ध असून, यात शहरातील पूर्व प्राथमिकच्या ३९ व प्राथमिकच्या १८२१ जागांसह १८६० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी मिळणार असून, ग्रामीण भागातील २२१ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.
शाळास्तरांवर मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या असून, पालकांनी २२ मार्चपर्यंत प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी यापूर्वी सर्वच संवर्गासाठी उत्पन्नाच्या मर्यादेची अट होती. मात्र आता खुला प्रवर्ग वगळता इतर सर्व प्रवर्गांसाठी उत्पन्नाची अट रद्द करण्यात आली आहे. खुल्या प्रवगार्साठी एक लाखाच्या आत उत्पन्नाची अट ठेवण्यात आली आहे. आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया आरटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इतर संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
कागदपत्रांची पडताळणी होणार
यावर्षी शाळास्तरावर कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी होणार नसून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी होणार आहे. कागदपत्रांची पूर्तता नसणाºया विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होेतील. एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण करून शंभर टक्के मोफत जागा भरण्याचे नियोजन आहे. पालकांना काही अडचणी असल्यास शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागतर्फे करण्यात आले आहे.